How To Reduce Cholesterol : शरीर निरोगी ठेवण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पदार्थांचे सेवन करतात, तर शरीर निरोगी ठेवण्यासाठी हृदय निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेकजण विविध औषधे घेण्यास सुरुवात करतात. (Health Tips in Marathi News) पण असे केल्याने तुमचे आरोग्यही बिघडू शकते.अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहारात काही घरगुती ड्रिंकचा समावेश करु शकता. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात कोणत्या ड्रिंकचा समावेश करावा हे जाणून घ्या. (Health in Marathi News)
एक चमचा मेथीचे दाणे, दालचिनीचे 3 तुकडे, एक चमचा किसलेले आले, स्टार बडीशेप (चक्रफूल), एक आलसी.
हे ड्रिंक बनवण्यासाठी एक ग्लास पाणी गरम करा. आता या पाण्यात मेथी दाणे, दालचिनीचे तुकडे, आले आणि आलसी टाका आणि हे पाणी 4 मिनिटे उकळावा. पाण्याला चांगली उकळी आल्यावर ते पाणी गाळून घ्या आणि त्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळ आणि त्यानंतर हे ड्रिंक प्या.
तुम्ही हे घरी बनविलेले ड्रिंक दिवसा कोणत्याही वेळी पिऊ शकता. पण लक्षात ठेवा की हे ड्रिंक कधीही रिकाम्या पोटी पिऊ नका. दुसरीकडे, जर तुम्हाला अॅलर्जी किंवा इतर कोणताही आजार असेल तर तुम्ही हे ड्रिंक पिणे टाळावे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)