मुंबई : दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो असं म्हणतात. त्यामुळे तूमचा दिवस चांगला जावा यासाठी आम्ही तूम्हाला खास टीप्स सांगणार आहोत. या टीप्स तूमचा दिवस चांगला जाण्यास मदत करतील.
व्यायाम
सकाळी उठून सर्वप्रथम व्यायाम करा.मग तो कोणताही असो, चालणे, जॉगिंग, सायकलिंग, हायकिंग यामुळे शरीरात हॅप्पी हार्मोन्स वाढू शकतात. यामुळे तुमची व्हिटॅमिन डी पातळी देखील वाढू शकते.
नृत्य
नृत्य हा व्यायामाचाच एक भाग आहे. नृत्यातूनही तुम्ही तुमच्या व्यायामाच्या भावना व्यक्त करू शकता. जेव्हा तुम्ही ग्रुपसोबत नाचता, तेव्हा तुमचे बाकीच्यांसोबत चांगले बॉन्ड तयार होते. याचा तुम्हाला मोठा फायदा होतो.
हसणे
हसणं हे शरीरासाठी औषधाप्रमाणे काम करते. 2017 च्या स्टडीनुसार, सोशल लाफ्टर एंडोर्फिन हार्मोन्स रिलीज करण्यास मदत करू शकते. त्याचवेळी 2011 मध्ये केलेल्या आणखी एका स्टडीनुसार, हसल्यामुळे वेदना सहन करण्याची क्षमता वाढते.
आवडते अन्न
जेव्हा तुम्ही तुमचा कोणतीही आवडता कोणताही पदार्थ खाता तेव्हा ते एंडोर्फिन हार्मोनची लेवल वाढवते. त्यामुळे तुम्हाला तुमची प्रत्येक सकाळ खूप आनंददायी असावी असे वाटत असेल तर त्यासाठी तुमचे आवडते पदार्थ खा किंवा काहीतरी नवीन करून पहा.
मिठी मारणे
फिजिकल टचनेही तुमच्या शरीरात अनेक चांगले बदल दिसून येतात. जेव्हा तुम्ही एखाद्याला मिठी मारता तेव्हा शरीरात ऑक्सिटोसिन नावाचा हॅपी हार्मोन रिलीज होतो. ऑक्सिटोसिन हे एंडॉर्फिन हार्मोनसारखे आहे कारण ते केवळ तुमचा मूड सुधारत नाही तर आनंद देखील वाढवतात.