सीरम इंस्टिट्यूटच्या दुसऱ्या लसीबद्दल 'या' गोष्टी माहितीयेत का?

दुसऱ्या लसीसाठी सीरम इन्स्टिट्यूटने आता जागतिक आरोग्य संघटनेकडून (डब्ल्यूएचओ) आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मागितली आहे.

Updated: Sep 25, 2021, 07:30 AM IST
सीरम इंस्टिट्यूटच्या दुसऱ्या लसीबद्दल 'या' गोष्टी माहितीयेत का? title=

दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूटची दुसरी कोरोना लस नोवावॅक्स तयार असल्याची माहिती आहे. यानंतर सीरम इन्स्टिट्यूटने आता जागतिक आरोग्य संघटनेकडून (डब्ल्यूएचओ) आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मागितली आहे. सीरमने औषधांची कंपनी नोवावॅक्ससोबत मिळून नोवावॅक्स लस तयार केली आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड लस भारतात आधीच दिली जात आहे. ही लस अॅस्ट्रॅजेनिका नावाने अमेरिका, युरोप या ठिकाणी दिली जात आहे.

नोवावॅक्सने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, WHOला केलेला अर्ज कंपनीने भारतातील DCGIला पूर्वी केलेल्या नियामक सबमिशनवर आधारित आहे. नोवावॅक्सचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्टेनली सी इर्क यांनी सांगितलं की, ही कोविड लस प्रोटीन आधारित आहे. 

21 दिवसांच्या अंतराने नोवावॅक्सचा डोस घ्यावे लागतील

नोवावॅक्स ही देखील दोन डोसची आहे. हे दोन 21 दिवसांच्या अंतराने दिले जातात. ही लस 2-8 डिग्री सेल्सियस तापमानात ठेवली जाते. याचा अर्थ आधीच अस्तित्वात असलेल्या लसींसाठी तयार केलेल्या कोल्ड चेन चॅनेलचा वापर त्यांना साठवण्यासाठी केला जाऊ शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतात या लसीची किंमत प्रती डोस 1,114 रुपयांपर्यंत असू शकते. सुरुवातीच्या आकडेवारीबद्दल बोलताना, ही लस 90 टक्के प्रभावी आणि सुरक्षित असल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान लसीकरणानंतर डोकेदुखी, स्नायू दुखणं हे त्रास जाणवू शकतात.

याला प्रोटीन सबयूनिट लस असंही म्हणतात. यामध्ये कोरोना स्पाइक प्रोटीनची नुकसान न होणाऱ्या प्रती बनवल्या जातात. हे प्रोटीननंतर व्हायरस सारख्या नॅनोपार्टिकल्समध्ये बदलतात. लस तयार करण्यासाठी, त्यात इम्यून-बूस्टिंग कमाउंड जोडले जाते, ज्याला सहाय्यक (Adjuvant) म्हणतात. नोवावॅक्स लस अँन्टीबॉडीज बनवण्यासह संक्रमित पेशी नष्ट करते.