Health Tips - विषाणू किंवा काही आजाराच्या यकृतावर झालेल्या परिणाममुळे कावीळ होतो. रक्तातील बिलिरुबीनचं प्रमाण वाढलं तर तुम्हाला कावीळ होतो. ज्यांच्या शरीरातील रक्तात हिपेटायटिस बी आढळल्यास त्याला पांढरा कावीळ म्हणतात. भारतात 0.5 टक्के लोकांमध्ये हिपेटायटिस बीचं इन्फेक्शन आढळून येतं. आज आपण काळी कावीळबद्दल जाणून घेणार आहोत. साधारण कावीळ झाल्यावर डोळ्यामध्ये पिवळेपणा दिसतो. कावीळ झाल्यावर ज्या रुग्णांची त्वचा कोरडी आणि काळी पडते त्यांना ब्लॅक जॉन्डिस किंवा काळी कावीळ म्हणतात. काळी कावीळ म्हणजे ही रुग्णासाठी धोक्याची घंटा आहे. कावीळमुळे किडनी डॅमेज होतं आणि तुम्हाला कॅसर सारखे आजार होण्याची भीती असते. कावीळच्या गंभीररुपाला काळी कावीळ म्हटलं जातं.
1. रुग्णांना ताप येणे
2. थकवा
3. डोळ्यामध्ये पिवळेपणा दिसणे
4. लघवी पिवळी होणे
5. नखे पिवळी पडतात
6. त्वेचला खाज सुटणे
7. भूक न लागणं
8. सांधेदुखी
9. उलट्या
10. अतिसार होणे
11. ओटीपोटात वेदना
1. जर गर्भवतीला हॅपिटाइटिस बीचा संसर्ग झाला असेल, तर नवजात बालकाला काळा कावीळ होऊ शकतो.
2. नशा करण्यासाठी एका सुईचा उपयोग अनेकांकडून झाला तर तुम्हाला कावीळ होतो.
3. असुरक्षित सेक्स
4. संसर्ग झालेल्या रुग्णांचं रक्त दुसऱ्या रुग्णाला दिल्यास
5. संसर्ग झालेल्या व्यक्तीचा ब्रश वापरल्यास
1. सेक्स करताना कंडोमचा उपयोग करा
2. अंमली पदार्थ, ड्रग्स इंजेक्शन यापासून दूर राहा
3. टॅटू बनवताना सुई आणि इतर स्वच्छेतेबद्दल सतर्क राहा
भारत सरकारकडून कावीळशी लढण्यासाठी लसीकरण मोहीम हातात घेतली आहे. नवजात बालकाला पहिली लस देण्यात येते, त्यानंतर एका महिन्यानंतर बालकाला लस दिली जाते. तर तिसरी लस बालक 6 महिन्यांचा असताना. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते हे लसीकरण कावीळशी दोनहात करण्यासाठी प्रभावी आहे.