मुंबई : अंगाची काहिली करणारा उन्हाळा सुरु झालाय. उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला अधिक पाण्याची गरज असते. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी तुम्ही सतत लिक्वीड घेत असता. मात्र या ऋतूत काही फळे आणि भाज्यांचे सेवन केले पाहिजे ज्या शरीरासाठी लाभदायक असतात. या भाज्यांपैकी एक म्हणजे काकडी. उन्हाळ्यात काकडीचे सेवन शरीरासाठी चांगले मानले जाते. यात व्हिटामिन्सचे प्रमाण अधिक असते जे शरीरासाठी फायदेशीर असते.
काकडीमध्ये आढळणारे पाणी आणि फायबर शरीरातील पाचनक्रिया सुरळीत राखण्यास मदत करतात. जर तुम्हाला गॅस, बद्धकोष्ठतेचा त्रास आहे तर एक ग्लास काकडीचा रस प्यायल्याने आराम मिळतो.
काकडी ब्रेडमध्ये टाकून तुम्ही सँडविच म्हणूनही खाऊ शकता. अनेकांना फळ खाण्यापेक्षा फळाचा रस प्यायला आवडतो. तुम्हालाही फळ खाणे आवडत नसेल तर फळांचा रस काढून प्या. काकडीचा रसही तुम्ही पिऊ शकता. काकडीमध्ये ९५ टक्के पाणी असते ज्यामुळे डिहायड्रेशनपासून बचाव होतो.
काकडीत असणारे प्रोटीन शरीराला कॅन्सरशी लढण्याची शक्ती देतात. तसेच कॅन्सरपासून बचावही होतो. कॅन्सरच्या पेशी वाढण्यास रोखतात. त्यामुळे याला कॅन्सरविरोधी फळ म्हटले जाते. काकडीच्या सेवनाने कॅन्सरचा धोका कमी होतो.
काकडी दातांनी तोडून थोडा वेळ तोंडात ठेवल्यास मुख दुर्गंधी दूर होते. काकडी चावून खाल्ल्याने तोंडातून येणारी दुर्गंधी दूर होते. दुर्गंधी पसरवणारे बॅक्टेरिया काकडी खाल्ल्याने नष्ट होतात.
काकडीचा वापर सुंदरता वाढवण्यासाठी केला जातो. जर उन्हामुळे चेहरा काळवंडला असेल तर काकडीचा पॅक लावून दूर केला जाऊ शकतो. यामुळे त्वचा उजळ होते. काकडी त्वचेसाठी टोनिंगचे काम करते.
दररोज कमीत कमी दोन काकड्या खाल्ल्या पाहिजेत. सकाळी भरपूर नाश्ता करा. दुपारच्या जेवणात शक्य असेल तर एक काकडी खा. जर हे शक्य नसेल तर रात्रीच्या जेवणात कमीत कमी दोन काकड्या खाल्ल्या पाहिजेत. यामुळे तुम्ही चपाती अधिक खाणार नाही. पाचनशक्ती वाढेल यासोबतच वेगाने वजन कमी होण्यास मदत होईल.