मुंबई : अनेकदा नकळत काही असे पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्यांना आमंत्रण मिळते. किडनीमध्ये मिनिरल सॉल्ट म्हणजेच कॅल्शियम आणि साचून राहिल्यास त्याचे मूतखड्यामध्ये रुपांतर होते. मूत्रवाहिनीतून छोटे तुकडे आणि टाकाऊ घटक सहज बाहेर पडतात परंतू मोठे खडे बाहेर पडू शकत नसल्याने ते अडकून वेदना होतात. म्हणून किडनी स्टोन असल्यास हे ६ पदार्थ खाणे टाळा. अन्यथा समस्या अधिक गंभीर रुप धारण करेल.
सिमला मिरचीत ऑक्सलेटचे क्रिस्टल्स असतात. जे कॅल्शिअमसोबत मिसळल्याने त्याचे कॅल्शिअम ऑक्सलेट क्रिस्टल बनतात. याला स्टोन असे म्हणतात. सिमला मिरची कमी खाल्याने तुम्ही स्टोनच्या समस्येपासून दूर राहू शकता.
टॉमेटोच्या बियांमध्ये ऑक्सलेटचे भरपूर प्रमाण असते. त्यामुळे टॉमेटोच्या बिया काढून टॉमेटो खा.
किडनी स्टोनची समस्या असल्यास ऑक्सलेटने परिपूर्ण असलेले चॉकलेट्स खाणे टाळा.
किडनी स्टोनची समस्या गंभीर असल्यास चहाची सवय सोडून द्या.
माशांमध्ये प्यरीन्स भरपूर प्रमाणात असतात. याच्या सेवनाने युरीक अॅसिड शरीरात अधिक प्रमाणात तयार होते. यामुळे युरीक अॅसिड स्टोन बनण्याची शक्यता वाढते.
मीठयुक्त पदार्थ किडनी स्टोनला आमंत्रण देतात. त्यामुळे किडनी स्टोनची समस्या टाळायची असल्यास मीठयुक्त पदार्थ खाणे कमी करा.