मुंबई : धावपळीच्या आणि तणावयुक्त जीवनशैलीत ऑफिसमधून घरी येताच थकल्यासारखे वाटते, चीडचीड होते, राग येतो. अनेकदा ऑफिसमधील टेन्शन्स घरात व्यक्त केले जाते. त्यामुळे साहजिकच घरातील वातावरणही काहीसे बिघडते. त्यामुळे मनःशांती दुर्मिळ झाली आहे. पण दिवसाची सुरुवात काही खास गोष्टी करुन केल्यास ही चीडचीड, राग दूर राहील. तर जाणून घेऊया दिवस चांगला आणि तणावमूक्त जाण्यासाठी दिवसाची सुरुवात नेमकी कशी करावी...
सकाळी उठल्यावर घराच्या खिडक्या उघडा. ताजी, शुद्ध हवा आत येऊ द्या. कोवळा सुर्यप्रकाश आत आल्याने फ्रेश वाटेल. त्याचबरोबर या प्रकाशामुळे मेलाटोनिन प्रॉडक्शन कमी होऊन आणि अड्रेनलिन प्रॉडक्शन सुरु होते. त्यामुळे तुमचे झोप उडते आणि चीडचीड होत नाही.
व्यायामामुळे तुम्हाला संपूर्ण दिवसभर फ्रेश, टवटवीत, आनंदी वाटते. सकाळी ३० मिनिटे व्यायाम केल्यामुळे शारिरीक-मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. व्यायामामुळे इंडोर्फिन्स हार्मोन्स सक्रिय होते आणि तुम्हाला दिवसभर फ्रेश राहण्यास मदत होते.
सकाळी खूप धावपळ असते. पण स्वतःसाठी १०-१५ मिनिटे दिल्यास शांती व समाधान लाभेल. यावेळात तुम्हाला हवे ते करा. तुमच्या आवडीचे संगीत ऐका. पुस्तक वाचा. पण दिवसभरात स्वतःसाठी थोडा वेळ जरुर द्या.
सकाळी जितक्या वाजता उठायचंय त्याच्या १५ मिनिटं आधीचा अलॉर्म लावून झोपा. त्यामुळे सकाळी उठून स्ट्रेचिंग करायला, स्वतःला वेळ द्यायला वेळ मिळेल. धावपळ होणार नाही.