रिकाम्या पोटी 'ही' फळं खाणं आरोग्याला त्रासदायक

आहारात ऋतूमानानुसार फळांचा समावेश करणं फायदेशीर आहे.

Updated: Jul 19, 2018, 10:22 PM IST
रिकाम्या पोटी 'ही' फळं खाणं आरोग्याला त्रासदायक  title=

मुंबई : आहारात ऋतूमानानुसार फळांचा समावेश करणं फायदेशीर आहे. मात्र त्याचंही काही पथ्यपाणी असतं. अतिप्रमाणात फळं खाणं किंवा चूकीच्या पद्धतीने फळं खाल्ल्यास आरोग्याला त्रास होतो. नाश्त्याला फळं खाण्याची काहींना सवय असते. मात्र रिकाम्यापोटी काही फळं खाल्ल्यास आरोग्याला त्याचे नुकसान होते. गोड फळं रिकाम्या पोटी खाल्ल्यास रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं, यामुळे मधुमेह जडण्याचा धोका बळावतो.  

रिकाम्या पोटी फळं खाण्याचे दुष्परिणाम 

आंबा - 

आहारतज्ञांच्या सल्ल्यानुसार, रिकाम्यापोटी आंबा खाऊ नका. आंब्यात मुबलक साखर असते. त्यामुळे रिकाम्यापोटी आंबा खाणं आरोग्याला त्रासदायक ठरतं. 

केळ - 

केळं आरोग्याला फायदेशीर आहे. सकाळी रिकाम्यापोटी केळं खाल्ल्यास त्रासदायक ठरू शकते. केळ्यात मॅग्नेशियम घटक असतात. रिकाम्या पोटी केळं खाल्ल्यास रक्तात मॅग्नेशियमचं प्रमाण झपाट्याने वाढतं. हे हृद्याच्या आरोग्यासाठी त्रासदायक आहे. 

द्राक्ष 

द्राक्ष हे एक सायट्र्स फळ आहे. त्यामधील अ‍ॅसिड घटक रिकाम्या पोटी शरीरात गेल्यास गॅस्टिक अल्सर, पोटात जळजळ वाढवण्यास कारणीभूत ठरतात. पोटात गॅस तयार होण्यासोबतच हृद्यविकाराच्या झटक्याचा धोका असतो. 

लिची 

लिची हे पाणीदार फळं स्वादिष्ट असले तरीही रिकाम्या पोटी खाऊ नका. यामुळे पचनकार्य बिघडते. पोटदुखीचा त्रास वाढतो.

टोमॅटो 

टोमॅटोमध्ये टॅनिक अ‍ॅसिड अधिक असते. यामुळे पोटात आम्ल वाढण्याची शक्यता असते.