मुंबई : हेल्दी राहण्यासाठी शरीरास सकस आहाराची फार गरज असते. आताच्या काळात सर्वांना फास्ट फूड जास्त आवडतात, त्यामुळे रोजच्या आहाराकडे दुर्लक्ष होते. फास्ट फूड आणि तेलकट पदार्थ आरोग्यास घातक असतात. कित्येक लोक पोळ्या बनवण्यासाठी तेल किंवा डालड्याचा उपयोग करतात. तर पोळ्या बनवण्यासाठी तूपाचा वापर शरीरास अधिक लाभदायक आहे. तूपामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्वे असतात. तुम्हाला वाटत असेल, तूप खाल्याने वजन वाढतं तर हा एक गैरसमज आहे.
वजन कमी करण्यासाठी तूपाची मदत होते.
तूप आपल्या शरीरातील मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करतो. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
त्वचेसाठी लाभदायक तूप
तूपामध्ये एन्टीऑक्सीडेंट घटक असतात ते त्वचेसाठी फार फायदेशीर असतात. त्याचप्रमाणे त्वचेमध्ये असलेले डेड सेल्स तूपाच्या नियमित सेवनाने नष्ट होतात.