Side Effects of Drinking Water in Summer: आपल्याला उन्हाळ्यात अनेक गोष्टींची काळजी (Summer Health Tips) घ्यावी लागते. खासकरून आपल्याला अशावेळी आपल्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष हे द्यावे लागते. उन्हाळ्यात अनेकांना थंड पाणी प्यावेसे वाटते. आपण अनेकदा बाहेरून दमून भागून आल्यानंतर स्वयंपाक घरात जाऊन थंड पाणी पिण्याची घाई करतो. त्यामुळे आपल्या जीवाला बर वाटतं आणि आपली तहानही भागते. परंतु गर्मीमध्ये थंड पाणी पिण्याचे अनेक तोटेही आहेत. तुम्हाला याकडे दुर्लेक्ष (Cold Water Effects on Health) होऊन चालणार नाही. तेव्हा पाहूया की, उन्हाळ्यात पाणी पिण्याचे नक्की तोटे काय आहेत? (health tips what are the side effects of drinking cold water in summer)
आपल्याला उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे. मुळात आपल्या शरीरात 8 ते 10 ग्लास तरी पाणी जाणं आवश्यक आहे. उष्माघाताचाही त्रास सध्या वाढू लागला आहे. त्यामुळे पुष्कळ पाणी पिणं हे आपल्यासाठी गरजेचे आहे. आपल्या शरीराला डिहायड्रेट ठेवणं हे आपल्यासाठी तितकंच आवश्यक (Cold Water Side Effects in Summer) आहे. त्यातून तुम्ही साधं पाणी उन्हाळ्यात पिणं आवश्यक आहे त्यातून फ्रिजमधील थंड पाणी पिणं आपल्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. तेव्हा थंड पाणी प्यायल्यानं तुम्हाला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो. थंड पाणी उन्हाळ्यात प्यायल्यानं तुम्हाला खालील आजारांचा सामना करावा लागू शकतो.
दातांना त्रास - थंड पाणी प्यायल्यानं तुम्हाला दातांचा त्रास होऊ शकतो. त्यातून तुमच्या दातांची सेन्सेटिव्हिटी वाढू शकते. अशावेळी अतिथंड पाणी शक्यतो टाळावे. रोज थंड पाणी पिऊ नको. यानं दात खराब होऊ शकतात.
पाचनक्रियेवर परिणाम - गर्मीमध्ये थंड पाणी प्यायल्यानं तुम्हाला पोटाचे विकार होऊ शकतात. तुमची पचनसंस्था बिघडू शकते. थंड पाण्याचा परिणाम पोटावर लवकर होतो.
वजन - अशावेळी तुम्हाला तुमचे वजन कमी करता येत नाही. यातून तुमच्या शरीराला जास्त वाढीव वजनाची सवय लागू शकते.
घसा खवखवणे - अनेकांना उन्हाळ्यातही सर्दीचा सामना करावा लागतो. त्यातून तुम्ही जर का थंड पाणी पित असाल तर तुमच्यावर त्याचा अधिकच परिणाम व्हायला वेळ लागत नाही. याचा परिणाम तुमच्या श्वसननलिकेवर होऊ शकतो.
हृदयाचे ठोके मंदावतात? - उन्हाळ्यात थंड पाणी प्यायल्यानं तुमच्या रक्तवाहिन्यावर परिणाम होऊ शकतो तेव्हा अशावेळी तुम्ही योग्य ती काळजी घेणे बंधनकारक असते. तेव्हा उन्हाळ्यात शक्यतो थंड पाणी पिणं टाळावे कारण यामुळे तुम्हाला नाना तऱ्हेच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)