How To Check Hemoglobin: ज्यावेळी तुमच्या शरीरात रक्ताची कमी होते, त्याला स्थितीला अॅनिमिया असं म्हणतात. या समस्येमध्ये व्यक्तीच्या शरीरात लाल रक्त पेशी तयार होणं बंद होतं. परिणामी यामुळे तुमच्या शरीरातील हिमोग्लेबिनचा स्तर कमी होऊ लागतो. असा परिस्थितीत शरीरात अशक्तपणा आणि बेरंग त्वचा अशी अनेक प्रकारची लक्षणे दिसतात. अनेकदा या समस्येकडे दुर्लक्ष केलं जातं. मात्र असं करणं महागात पडण्याची शक्यता आहे.
तुमच्या शरीरातील ब्लड लेवल घर बसल्या कशी तपासावी हे आज आपण जाणून घेऊया. NBCI च्या रिपोर्टनुसार, तज्ज्ञांनी एक वेगळी पद्धत विकसीत केली आहे. ज्याच्या मदतीने स्मार्टफोन आणि एका एप्लिकेशनच्या मदतीने तुमच्या शरीरातील रक्तामध्ये किती प्रमाणात हिमोग्लोबिन आहे, याची माहिती मिळू शकते.
हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमध्ये आढळणारं एक प्रोटीन आहे. हे प्रोटीन शरीरातील पेशींना ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतं. त्याचं प्रमाण कमी होणं हे अशक्तपणाचं लक्षण मानलं जातं. पुरुषांमध्ये 13.5 g/dL पेक्षा कमी आणि स्त्रियांमध्ये 12.0 g/dL पेक्षा कमी हिमोग्लोबिन अशक्तपणा दर्शवतं. तरूण आणि लहानांमध्ये हे प्रमाण वेगवेगळं असू शकतं.
स्मार्टफोनद्वारे हिमोग्लोबिन तपासण्यासाठी तुम्हाला सुईची गरज लागणार नाही. यामध्ये तुम्ही तुमचे फिंगरनेल्सचा फोटो त्या संबंधित अॅपद्वारे घ्या. त्यानंतर फोटोमधील नखाखालील भागाच्या रंगाचं विश्लेषण करून ॲप हिमोग्लोबिनच्या पातळीचा अंदाज लावण्यात येतो. हे तंत्रज्ञान अद्याप विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे, परंतु भविष्यात यामुळे ॲनिमियासारख्या आजारांचं निदान करणं अधिक सोपं होऊ शकतं. याचा विशेषत: वैद्यकीय सुविधा मर्यादित असलेल्या भागात राहणाऱ्या लोकांना फायदा होऊ शकतो.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)