HOW TO GET PINK LIPS: सुंदर दिसणं प्रत्येकाला हवं असत. चेहऱ्याच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी ओठ खूप महत्वाची भूमिका निभावतात.
प्रत्येकाच्या स्किनचा रंग हा वेगळा वेगळा असतो, त्याप्रमाणे ओठांचा रंग बदलत असतो. त्यामुळे सगळ्यांच्याच ओठाचा रंग हा एकसारखा नसतो.
पण बऱ्याचदा पिगमेंटेशन, धूम्रपान या सर्वांमुळे ओठांचा रंग बदलू शकतो, मग अशा वेळी काय करायचं हा मोठा प्रश्न समोर उभा राहतो. पण आता हे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये.
कारण अगदी सोपे आणि घरच्याघरी काही टिप्स वापरून तुम्ही सुंदर आणि गुलाबी ओठ मिळवू शकता. (How to get rid of dark lips and get pink soft lips naturally )
1. ओठांना मॉइश्चरायझ करा (moisturise lips everyday)
बहुतेक लोक चेहऱ्याची खूप काळजी घेतात, पण ओठांची काळजी घ्यायला विसरतात. हायड्रेशन आणि पोषणाच्या कमतरतेमुळे ओठ कोरडे होऊन काळे पडतात. अशा परिस्थितीत तुम्ही शिया बटर किंवा लिप बामद्वारे ओठांना मॉइश्चरायझ करू शकता. असे नियमित केल्याने ओठ काळे होणार नाहीत. (How to get rid of dark lips and get pink soft lips naturally )
2. धूम्रपान सोडा (quit smoking)
स्मोकिंगमुळे ओठ काळे पडतात, कारण सिगारेट आणि तंबाखूच्या धुरात निकोटीन आणि बेंझोपायरिन आढळतात, त्यामुळे शरीरात मेलेनिनचे प्रमाण वाढते आणि ओठ काळे पडतात, असे त्वचा तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
3. पुरेसे पाणी प्या (drink enough water)
जर तुम्ही पाणी कमी पीत असाल तर त्याचा प्रभाव ओठांच्या रंगावर दिसून येतो, कारण त्वचेमध्ये 70 टक्के पाणी असते. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे ओठ काळे पडतात, अशा स्थितीत व्यक्तीने नियमित 8-10 ग्लास पाणी प्यावे.
4. आठवड्यातून दोनदा स्क्रब नक्की करा
बहुतेक लोक ओठ स्क्रब (scrubbing) करत नाहीत, त्यामुळे त्यावरील मृत त्वचेच्या पेशी (Dead Skin) निघत नाहीत. ओठावरील मृत पेशींमुळे ते काळे पडतात, त्यामुळे जर तुम्हाला गुलाबी ओठ मिळवायचे असतील तर नियमितपणे ओठ स्क्रब करा. (How to get rid of dark lips and get pink soft lips naturally )
(वरील बातमी सामान्य माहितीच्या आधारे आहे झी २४ तास याची खातरजमा करत नाही)