मुंबई : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली असून याला वेग देण्यात येतोय. कोरोना प्रतिबंधक लस लोकांना इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी मदत करते. दरम्यान आता एका अभ्यासात दावा करण्यात आला आहे की, कोरोनातून मुक्त झालेल्या रूग्णांनी लस घेतली नाही तर त्यांना पुन्हा इन्फेक्शन होण्याचा धोका दुप्पट असतो.
शुक्रवारी सेंटर फॉर डिसीज कंट्रोल एंड प्रिवेंशन नावाच्या अहवालात शास्त्रज्ञांनी अपील केलं आहे की कोरोना लसीचा डोस घ्यावा. कारण जलद गतीने पसरणाऱ्या डेल्टा वेरिएंटचा धोका वाढतोय. त्याचा धोका त्या लोकांना देखील आहे ज्यांना यापूर्वी कोरोनाची लागण होऊन गेली आहे.
अहवालात नमूद केल्यानुसार, लस लोकांच्या नैसर्गिक प्रतिकारशक्तीला बळ देतेय आणि व्हायरसच्या नवीन प्रकारांपासून संरक्षण देखील देत असल्याचे पुरावे प्रयोगशाळेत सापडले आहेत.
सीडीसीचे डायरेक्टर रोशेल वालेंस्कीने सांगितलं की, जर तुम्हाला यापूर्वी कोरोनाची लागण झाली असेल तर तुम्ही त्वरित कोरोनाची प्रतिबंधक लस घेतली पाहिजे. लस घेणं आपल्या आसपासच्या लोकांची सुरक्षेसाठी एक चांगला पर्याय आहे. हे त्यासाठी गरजेचं कारण देशात कोरोना व्हायरसचा डेल्टा वेरिएंट जलद गतीने पसरताना दिसतोय.
नव्या वेरिएंटमुळे होणारं पुन्हा इन्फेक्शनबाबत अजून माहिती कमी आहे. मात्र अमेरिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांनी यूकेच्या डेटावरून, अशी शक्यता आहे की डेल्टा वेरिएंटमुळे पुन्हा संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. जर तुम्हाला गेल्या सहा महिन्यांत कोरोनाची लागण झाली असेल तर अल्फा व्हेरिएंटपेक्षा या व्हेरिएंटमध्ये पुन्हा संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे.
संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ डॉ. अँथनी फाउची म्हणाले की, यात काही शंका नाही की ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांना लसीद्वारे रोग प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते.