मुंबईसह महाराष्ट्राच गेल्या काही दिवसांपासून वातावरण अतिशय खराब आहे. नोव्हेंबर महिना संपत आला तरी थंडी अनुभवता आली नाही. पण या दरम्यान उन्हाचा तडाखा आणि पाऊस अनुभवला आहे. यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम झालेत. सर्दी, खोकला, ताप यासारखे साथीचे आजार पसरले आहेत. अशावेळी इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती महत्त्वाची भूमिका बजावत असते.
शरीरात रोगांपासून संरक्षण करण्यासाठी एक नैसर्गिक प्रणाली असते, ज्याला रोगप्रतिकारक शक्ती म्हणतात. जर तुम्हाला वारंवार खोकला, सर्दी, संसर्ग, अशक्तपणा जाणवत असेल तर याचा अर्थ तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाली आहे. अशा लोकांना अनेक आजार होतात आणि नंतर औषधांवर पैसे खर्च करावे लागतात. न्यूट्रिशनिस्ट अंजली मुखर्जी यांनी इम्युनिटी बूस्टर टिप्स दिल्या आहेत, जाणून घ्या.
नैसर्गिक रस
हळद, आवळा आणि आल्याचा ताजा रस नियमित प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. 4 इंच ताजी हळद, 2 आवळे, 2 इंच ताजे आले सोलून 50 मिली पाण्यात मिसळा. गाळून घ्या, चवीनुसार काळी मिरी आणि मीठ घालून नियमित प्या.
व्हिटॅमिन सी
व्हिटॅमिन सी केवळ प्रतिकारशक्तीच वाढवत नाही तर व्हायरस आणि बॅक्टेरियांना मारणाऱ्या पांढऱ्या रक्त पेशी देखील वाढवते. संत्रा, आवळा, ब्रोकोली, अननस, फ्लॉवर, कोबी आणि रताळ्यामध्ये हे जीवनसत्व सहज मिळते.
हे पदार्थ आवर्जून खा
अनेकजण लसूण आणि आलं जेवणातून बाहेर काढून टाकतात. या दोन्ही गोष्टी अनेक धोकादायक जीवाणू आणि विषाणूंविरुद्ध लढतात. यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटी-व्हायरल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. लसणाच्या 4-5 कच्च्या पाकळ्या रोज खाव्यात. दुसरीकडे, सकाळी तुम्ही आल्याचा चहा किंवा आल्याचा रस मध आणि कोमट पाण्यासोबत घेऊ शकता.
हिवाळ्यात मुळा खा
थंडीमध्ये सायनस, नाक बंद होणे, श्लेष्मा, मायग्रेन यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. मुळा खाल्ल्याने या सर्व समस्या दूर होतात. कच्च्या मुळ्याचा रस काढून हिवाळ्यात रोज सेवन करा.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय
बाजरी, सूर्यफुलाच्या बिया, पालक असे जस्त पदार्थ खा
व्हिटॅमिन ए, सेलेनियम, क्रोमियम, झिंक, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई यासारखे अँटिऑक्सिडंट्स रोज घ्या
गाजर, रताळे, ब्रोकोली, पालक, व्हिटॅमिन ए किंवा बीटा कॅरोटीन समृद्ध चेरी खा.