How To Use Desi Ghee For Glowing Skin: साजूक तूपाचे (Desi Ghee) सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. गायीचे तुप जेवणात वापरल्यास शरीराला अनेक फायदे मिळतात. पण तुम्हाला माहित्येय का साजूक तुपाने पायाच्या तळव्यांना मालिश करणे खूप जास्त फायदेशीर ठरु शकते. रात्री झोपताना तळव्यांना साजूक तुपाने मालिश केल्यास तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल. तुम्हाला हे ऐकायला कदाचित विचित्र वाटत असेल तरी हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. पायाच्या तळव्यांना शुद्ध तुपाने मसाज केल्यास काय फायदे मिळतात हे जाणून घ्या. (How To Use Desi Ghee For Glowing Skin In Marathi)
रात्री झोपण्याच्या आधी तळव्यांना मालिश केल्यास अनिद्रेपासून आराम मिळतो. झोप न येणे या समस्येने हैराण झाला असाल तर नैसर्गिंकरित्या झोप येण्याचा हा एक चांगला पर्याय आहे. तूप थोडेसे गरम करुन पायाच्या तळव्यांना मालिश केल्यास पायातील रक्ताभिसरण सुरळीत होते. त्यामुळं शरीराला अनेक फायदे मिळतात तसंच, झोप येण्यास मदत होते.
शुद्ध तुपात अँटीऑक्सिडेंटची मात्रा भरपूर प्रमाणात असते. त्वचेसाठी हे खूप फायदेशीर असते. पायाच्या तळव्यांना शुद्ध तुपाने मसाज केल्यास त्वचा उजळते. तसंच, त्वचा नाजूक आणि ग्लोइंग बनण्यासही फायदेशीर मदत करते. त्याचबरोबर चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि काळे डाग कमी करण्यासही मदत होते.
तळव्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी अॅक्युप्रेशर पॉईंट्स असतात. साजूक तुपाने तळव्याची मालिश केल्यास अॅक्युप्रेशर पॉइंट्स दाबले जातात. शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी पायाच्या तळव्याची मालिश करणे फायदेशीर ठरतं.
शरीरात वात दोष बिघडल्यास आजारांचा धोका संभवतो. त्यामुळं झोपण्यापूर्वी साजूक तुपानं हाताच्या तळव्यांना मालिश केल्यास शरीरातील वात संतुलित राखण्यास मदत होते.
मॉलिश करण्यासाठी सगळ्यात पहिले शुद्ध साजूक तूप थोडेसे गरम करा. त्यानंतर तुमच्या पायाच्या तळव्यावर आणि अंगठ्याच्या आजूबाजूला लावून चांगल्या पद्धतीने मालिश करा. 10 ते 15 मिनिटे हाताने मसाज करा. शुद्ध तुपामध्ये व्हिटॅमिन ए, ई आणि क आढळतते. त्यामुळं ताणतणाव कमी होण्यास मदत होते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)