राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र का येत नाहीत? संजय राऊतांनी स्पष्ट सांगून टाकलं!

महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र का येत नाहीत? संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले. वाचा सविस्तर 

सोनेश्वर पाटील | Updated: Nov 2, 2024, 07:58 PM IST
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र का येत नाहीत? संजय राऊतांनी स्पष्ट सांगून टाकलं! title=

Sanjay Raut : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे झी 24 तासच्या जाहीर सभा कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांना अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. ज्यामध्ये संजय राऊत यांना विचारले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? यावर संजय राऊत म्हणाले की, हा कौटुंबिक विषय आहे. हा काय राजकीय विषय नाहीये. परंतु राज ठाकरे यांनी भूमिका घेतली आहे की, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना मदत करण्याची. आमची भूमिका आहे की, महाराष्ट्र लुटण्याची जे भूमिका घेत आहेत. 

अमित शाह, फडणवीस आणि मोदी यांच्यासारखे लोक जे स्वाभिमान तोडण्याची भूमिका घेत आहेत. मग आम्ही त्यांच्या बरोबर कसं राहणार. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जे लोक अशी मदत करत असतील तर ते लोकं आमच्या कितीही जवळचे असतील तर आम्हाला त्यांच्याशी महाभारता प्रमाणे नाती गोती न पाहता हे युद्ध करावे लागले. 

राज ठाकरे यांनी एक नवीन पक्ष स्थापन केला आहे. ते त्या पक्षाचे नेते आहेत. त्याच्या पक्षाची भूमिका ही भारतीय जनता पक्षाला मदत करण्याची आहे. आमची भूमिका ही भारतीय जनता पक्षा हा महाराष्ट्राचा शत्रू आहे. त्यामुळे त्यांना कोणी मदत करत असेल तर आम्हाला त्यांच्यासोबत जायचं नाहीये. 

महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? 

आमच्या पक्षाने एक भूमिका मांडली आहे की निवडणुकीला समोरे जाताना एक चेहरा पाहिजे. त्यामध्ये चुकीचे काहीच नाही. तो चेहरा कोणीही असू शकतो. उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की, राष्ट्रवादीने त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्यावा. काँग्रेसने देखील त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्यावा. आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. त्यामध्ये आमची कसली माघार. ही तर आम्ही त्यांना संधी दिली होती.

उद्या महाराष्ट्राच नेतृत्व कोण करणार यावर देखील काही मत हिकडे-तिकडे फिरत असतात. राहुल गांधी यांचा चेहरा पंतप्रधान पदासाठी जाहीर झाला असता तर काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या 25 जागांवर परिणाम झाला असता. असं संजय राऊत म्हणाले.