चॅम्पियन्स ट्रॉफीचा 'कॅप्टन फोटोशूट इव्हेंट' का रद्द झाला? समोर आलं मोठं कारण

Champions Trophy 2025 : जवळपास 8 वर्षांनी आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले असून ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने पाकिस्तान आणि दुबईत खेळवली जाणार आहे. 

पुजा पवार | Updated: Jan 31, 2025, 04:17 PM IST
चॅम्पियन्स ट्रॉफीचा 'कॅप्टन फोटोशूट इव्हेंट' का रद्द झाला? समोर आलं मोठं कारण  title=
(Photo Credit : Social Media)

Champions Trophy 2025 : 19 फेब्रुवारी पासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) ला सुरुवात होणार आहे. जवळपास 8 वर्षांनी आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले असून ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने पाकिस्तान आणि दुबईत खेळवली जाणार आहे. यंदा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जवळपास 8 संघ सहभागी होणार असून प्रत्येक आयसीसी स्पर्धेच्या पूर्वी कॅप्टन फोटोशूट होतं असतं. परंतू आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कॅप्टन फोटोशूट होणार नाही अशी माहिती मिळत आहे. 

रोहित शर्मा पाकिस्तानला जाणार नाही : 

चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद हे पाकिस्तानकडे असल्याने भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा स्पर्धेआधी होणाऱ्या कॅप्टन फोटोशूटसाठी पाकिस्तानला जाणार की नाही याविषयी बरीच चर्चा होती. 1996 नंतर पाकिस्तानात आयसीसी स्पर्धा खेळवली जात आहे. परंतु भारत आणि पाकिस्तानचे बिघडलेले राजकीय संबंध आणि सुरक्षितता इत्यादी कारणांमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या कॅप्टन फोटोशूटसाठी बीसीसीआय रोहितला पाकिस्तानला पाठवण्यास तयार नाही अशी माहिती मिळत होती. परंतु आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कॅप्टन फोटोशूट होणार नाही अशी माहिती समोर आल्याने रोहित पाकिस्तानला जाणार की नाही यावादावर आता पडदा पडला आहे. 

हेही वाचा : अश्विनवर संशय घ्यायची त्याची पत्नी, 'या' खेळाडूवर क्रश असल्याची होती शंका

यापूर्वी 2017 मध्ये आयसीसीकडून शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. परंतु यावेळी देखील ओपनिंग सेरेमनी झाली नव्हती, मात्र तेव्हा ऑफिशियियल कॅप्टन फोटोशूट झाले होते. पीसीबीने सांगितले की आयसीसी आणि क्रिकेट बोर्डांनी यावेळी ओपनिंग सेरेमनीबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.  

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी का होणार नाही कॅप्टन फोटोशूट?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले की कॅप्टन फोटोशूट आणि त्यानंतर होणारी पत्रकार परिषद लॉजिस्टिकल कारणांमुळे होणार नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने हे दोन देशातील चार वेगवेगळ्या ठिकाणांवर खेळवेल जात आहेत. स्पर्धेची सुरुवात होण्याच्या काही दिवस आधी सर्व संघांनी पाकिस्तानात पोहोचणे अपेक्षित होते परंतु ऑस्ट्रेलिया 19 फेब्रुवारी पर्यंत पाकिस्तानात येणार नाही. आयसीसीने टी 20 वर्ल्ड कप 2024 पूर्वी देखील कर्णधारांचा कोणताही इव्हेंट घेतला नाही. तेव्हा देखील वर्ल्ड कप वेस्टइंडीज आणि यूएसए मध्ये खेळवण्यात आला होता. 

टीम इंडिया ग्रुप स्टेज सामने : 

20 फेब्रुवारी : गुरुवार - भारत विरुद्ध बांगलादेश - ठिकाण : दुबई 
23 फेब्रुवारी :  रविवार - भारत विरुद्ध पाकिस्तान - ठिकाण : दुबई 
2 मार्च  :  रविवार - भारत विरुद्ध न्यूझीलंड - ठिकाण : दुबई 

भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार) , शुभमन गिल (उपकर्णधार) , विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षत पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा