लहान मुलांमध्ये वाढते मधुमेहाचे प्रमाण

भारतीयांमध्ये मधुमेहाचे प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याचे दिसत आहे.

Updated: Apr 28, 2019, 11:03 AM IST
लहान मुलांमध्ये वाढते मधुमेहाचे प्रमाण title=

मुंबई : भारतीयांमध्ये मधुमेहाचे प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याचे दिसत आहे. लहानांपासून ते मोठ्यांसुद्धा या गंभीर आजाराने  घेरले आहे. भरतात एकूण ९७ हजार बालक मधुमेहचे शिकार झाले आहेत. शरीरात साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे मधुमेह प्रकार दोन होण्याची शक्यता असते. अशा रूग्णांना सतत तहान लागते. मधुमेह प्रकार दोनच्या रूग्णांनी नियमित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. रोजच्या आहारात तथ्य पाळावेत.  

मधुमेह होण्याची लक्षणे
- लहान मुलांच्या सतत पोटात दुखते.
- त्याचबरोबर उल्टी होण्याची शक्यता असते.
- डोके दुखणे.
- सतत लघुशंकेचा त्रास होणे.
- थकवा जाणवतो, अशा स्थितीत लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

आई-वडीलांना मधुमेह असल्यास मुलांनाही अजार होण्याची शक्यता असते. त्यांच्यातील आनुवंशिक गुण मुलांमध्ये येतो. त्यामुळे मुलांना मधुमेह प्रकार दोन होण्याची शक्यता असते. तुम्ही लहान मुलांना मधुमेह प्रकार दोन होण्यापासून रक्षण करू शकता. त्यांना पुरक आहार देण्यात यावा. मुलांच्या आहारात पालेभाज्या आणि ताज्या फळांचा वापर नियमित करावा. बाहेरचे फास्ट फूड खाणे शक्यतो टाळावे.