Junk Food nutrition and Side Effects Special Report: जसं नाव, तसंच काम. आपण इथं बोलतोय जंक फूडबाबत. आकर्षक पॅकेजिंगमध्ये उपलब्ध असणारं जंक फूड दिसायला कितीही आकर्षक असलं तरी ते शरिराला मात्र घातक आहे. मार्केटिंगच्या नावाखाली जंक फूडच्या कंपन्या असं जाळं टाकतात की बालकच नाही तर पालकही आरामात फसतात आणि हेच जंक फूड खाऊन आपलं शरीरही अगदी कचरा कुंडीसारखंच काम करतं.
बाजारात मिळणारं सर्व जंक फूड आरोग्य चाचणीत मात्र नापास ठरलं असूनही या जंक फूडची मागणी आणि पुरवठा या दोघांमध्येही मोठी वाढ होताना दिसतेय. याचं कारण काय? पाहा हा स्पेशल रिपोर्ट....
पोषण आहारावर काम करणाऱ्या Think Tank, Nutrition Advocacy for Public Interest म्हणजे NAPi ने Junk Food बनवणाऱ्या कंपन्यांचा पर्दाफाश केला आहे.
NAPi ने Breastfeeding Promotion Network of India सोबत मिळून भारतात उपलब्ध असणाऱ्या 43 Packaged Food Products चे सॅम्पल्स घेतले. या Pre Packaged Junk Food में ज्युस, कुकीज, चॉकलेट्स, हेल्थ ड्रिंक्स, चिप्स, आईस्क्रीम, इन्स्टन्ट नूडल्स आणि पिझ्झासारख्या सर्व प्रकारच्या जंक फूडचा समावेश केला. या प्रोडक्स्टमध्ये साखर, टोटल फॅट्स आणि सोडियमचं प्रमाण तपासण्यासाठी ते लॅबमध्ये पाठवण्यात आले.. मात्र लॅबमधून जो निकाल हाती आला तो धक्कादायक आहे.
43 पैकी 8 प्रोडक्स्ट्समध्ये साखर, टोटल फॅट्स आणि सोडियम या तिघांचंही प्रमाण जास्त असल्याटं इथं आढळलं. तर, 29 वस्तूंमध्ये टोटल फॅट्सचं प्रमाण जास्त आणि 19 उत्पादनांमध्ये सोडियमचं प्रमाण सर्वाधिक असल्याची बाब समोर आली.
एका वयस्क व्यक्तीच्या रोजच्या जेवणात 350 ग्रॅम भाजी, 150 ग्रॅम फळं, 90 ग्रॅम डाळी, कडधान्य, मांसाहारी पदार्थ, अंडी, ड्रायफ्रूट 30 ग्रॅम, तेल किंवा तूप 27 ग्रॅम आणि गहू, तांदूळ, मका, ज्वारी असं सर्व प्रकारचं अन्न 240 ग्रॅम इतकं प्रमाण असणं अपेक्षित असून, यामध्ये पाकिटबंद अन्नाचा उल्लेखही नाही. त्यामुळं इथून पुढं जंक फूड खाताना आपणच आपल्या शरीराला संकटात टाकतोय हे कायम लक्षात राहूद्या.