Kidney Health : सावधान ! पाणी पितांना तुम्ही ही चूक करत असाल तर होऊ शकतात किडनीचे आजार

Kidney disease : किडनीची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. किडनीचे आजार वाढत असल्याने काय काळजी घेतली पाहिजे.

Updated: Mar 18, 2022, 09:03 PM IST
Kidney Health : सावधान ! पाणी पितांना तुम्ही ही चूक करत असाल तर होऊ शकतात किडनीचे आजार title=

मुंबई : किडनी हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा भाग आहे जो आपल्या शरीरातील नको असलेल्या गोष्टी बाहेर काडण्याचं काम करतो. किडनी निरोगी असेल तर आपले आरोग्य चांगले राहते. चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि चुकीची जीवनशैली किडनीच्या आजारांना आमंत्रण देते. भारतात किडनीचे आजार असलेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, भारतातील दहापैकी एक व्यक्ती किडनीच्या आजाराने ग्रस्त आहे. (tips to prevent kidney disease)

किडनीच्या चांगल्या आरोग्यासाठी पाणी हे सर्वात मोठे इंधन आहे, जे लघवीद्वारे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि शरीर स्वच्छ करते. किडनीच्या आरोग्यासाठी पाण्यापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही. साधारणपणे असे दिसून येते की जे लोक कमी पाणी पितात त्यांना किडनी स्टोनचा (kidney stones) त्रास होतो.

तज्ज्ञांच्या मते, दररोज किमान 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. जास्त पाणी प्यायल्याने किडनीतून टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि किडनीमध्ये स्टोनचा (avoid kidney stones) त्रास होत नाही.

किडनीच्या चांगल्या आरोग्यासाठी फक्त पाणी पिणे पुरेसे नाही तर पाणी कसे प्यावे हे देखील महत्त्वाचे आहे. काही लोक उभे राहून पाणी पितात, ज्यामुळे किडनीच्या आरोग्याला हानी पोहोचते. आपण जाणून घेऊया की उभे राहून पाणी पिणे किडनीला तसेच आरोग्यालाही हानी पोहोचवू शकते.

उभे राहून पाणी पिल्याने किडनीला होणारे नुकसान : तज्ज्ञांच्या मते, उभे राहून पाणी पिण्याचा परिणाम संपूर्ण जैविक प्रणालीवर होतो. उभे राहून पाणी प्यायल्याने तुमच्या फुफ्फुसात ऍस्पिरेशन न्यूमोनिया (pneumonia) होऊ शकतो. उभे राहून पाणी प्यायल्याने पोटावर दाब पडतो, त्यामुळे शरीरातील सर्व अशुद्धी मूत्राशयात जमा होतात, ज्यामुळे नंतर किडनी खराब होते.

किडनी निरोगी ठेवायची असेल तर पाणी पिण्याची योग्य पद्धत अवलंबवा. नेहमी आरामात बसून पाणी प्या. पाणी हळू हळू पिऊन प्या.

फुफ्फुसांना होऊ शकते नुकसान : उभे राहून पाणी प्यायल्यास तुमच्या फुफ्फुसांनाही इजा होऊ शकते. उभे राहून पाणी प्यायल्याने पाणी झपाट्याने आत जाते, त्यामुळे फूड पाइप आणि विंड पाइपमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो. उभे राहून पाणी पिण्याची सवय सुधारली नाही, तर भविष्यात फुफ्फुसाचे आजार होऊ शकतात.