Rahul Gandhi allegation: राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील संसदेत चर्चेदरम्यान आज काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रपतींचे भाषण गेल्या काही वर्षांत दिलेल्या भाषणांसारखेच होते. नंतर त्यांनी अशा एका मुद्द्याचा उल्लेख केला ज्यामुळे यूपीए सरकारही अडचणीत आले. तसेच महाराष्ट्रातील लोकसभा, विधानसभा निवडणुकीत इतक्या मोठ्या संख्येने नवीन मतदार आले कुठून? असा प्रश्न उपस्थित केला. राहूल गांधी बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सभागृहात उपस्थित होते.
लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीदरम्यान महाराष्ट्रात हिमाचलच्या बरोबरीने मतदारांची भर पडल्याचं राहुल गांधींनी लोकसभेत सवाल उपस्थित केलाय.महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशच्या संपूर्ण लोकसंख्येइतके नवीन मतदार मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याच राहुल गांधींनी म्हटलं आहे. ही मतदारांची संख्या कुठून आली? असा सवाल राहुल गांधींनी विचारलं आहे.
राहुल गांधी म्हणाले, 'मी राष्ट्रपतींचे भाषण ऐकले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान काय बोलले जात होते यावर माझे लक्ष केंद्रित करण्यासाठी मला संघर्ष करावा लागला. कारण मी गेल्यावर्षी आणि त्यापूर्वीच्या वर्षी जवळजवळ असेच भाषण ऐकले होते. विरोधी पक्ष जर युती सरकार असते तर हे भाषण असे नसते, असे ते यावेळी म्हणाले. लोकसभेत राहुल गांधींनी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केलीय. आपलं उत्पादन क्षेत्र आपण चीनच्या हाती सोपवलं असल्याची टीका राहुल गांधींनी केलीय. सोबतच मेक इन इंडिया चांगली कल्पना होती पण अयशस्वी झाली असल्याचंही म्हटलंय.देशातील उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
देशाचे भविष्य तरुणच ठरवतील, म्हणून जे काही बोलले जाईल ते तरुणांवर केंद्रित असले पाहिजे. पंतप्रधानांनी 'मेक इन इंडिया'चा पुढाकार घेतला. ही एक चांगली कल्पना होती. पंतप्रधानांनी प्रयत्न केला पण प्रयत्न अयशस्वी झाल्याचे राहूल गांधी म्हणाले. एक देश म्हणून आपण उत्पादनात अपयशी ठरलो आहोत. यातील उत्पादनाचे काम चिनी कंपन्यांना देण्यात आल्याचा दावा करत हे मेड इन इंडिया नाही, तर 'असेम्बल्ड इन इंडिया' असल्याचे ते म्हणाले. देशाने उत्पादनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे ते म्हणाले. भारतात सामाजिक तणाव वाढत असल्याचेही ते म्हणाले.
प्रत्यक्षात 2004 ते 2014 पर्यंत यूपीए म्हणजेच काँग्रेस आघाडी सरकार सत्तेत होते. आपण बेरोजगारीची समस्या सोडवू शकलो नाही. युपीए सरकार तरुणांना बेरोजगारीवर कोणताही उपाय दाखवू शकले नाही आणि सध्याचे सरकारही काहीही करू शकले नाही. पंतप्रधानही या मुद्द्यावर माझ्याशी सहमत असतील, असे राहुल गांधी म्हणाले.