Weekly Tarot Horoscope : या आठवड्यात 4 राशींना आर्थिक लाभासह करिअरमध्ये उत्तम यश, पाहा साप्ताहिक टॅरो राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope Prediction 03 to 09 February 2025 in Marathi : फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात, मिथुन राशीमध्ये मंगळ आणि चंद्राचा संयोगाने धन योगाची निर्मिती होणार आहे. या धन योगामुळे मेष, सिंह राशीसह चार राशींसाठी फेब्रुवारीचा पहिला आठवडा विशेष फलदायी ठरणार आहे, असे टॅरो कार्डचे गणित दाखवत आहे. करिअरमध्ये प्रगती होण्यासोबतच या राशींसाठी आठवडा खूप फायदेशीर असणार आहे. चला तर मग जाणून टॅरो कार्डनुसार 12 राशींसाठी कसा असेल फेब्रुवारीचा हा आठवडा...  

नेहा चौधरी | Updated: Feb 3, 2025, 04:37 PM IST
Weekly Tarot Horoscope : या आठवड्यात 4 राशींना आर्थिक लाभासह करिअरमध्ये उत्तम यश, पाहा साप्ताहिक टॅरो राशीभविष्य title=

Weekly Tarot Horoscope Prediction 03 to 09 February 2025 in Marathi : फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात धन योगामुळे मेष, सिंह, कन्या आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. या राशीच्या लोकांना या आठवड्यात काही मोठ्या प्रकल्पात यश मिळणार असून तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. चला तर मग जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी फेब्रुवारीचा पहिला आठवडा कसा जाणार आहे, पाहा साप्ताहिक टॅरो भविष्य टॅरो कार्ड रीडर कविता ओझा यांच्याकडून  

मेष (Aries Zodiac)   

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सर्जनशीलता आणि समृद्धीचा असणार आहे. कुटुंबात आणि नातेसंबंधात आनंदाचे आणि प्रेमाचे वातावरण राहणार आहे. एखाद्या मोठ्या प्रकल्पात यश प्राप्त होणार आहे. कामाच्या ठिकाणी जमल्यास या आठवड्यात टीमवर्कवर लक्ष केंद्रित करा, त्याचे चांगले परिणाम तुम्हाला मिळतील. 

वृषभ (Taurus Zodiac)

या राशीच्या लोकांनी या आठवड्यात विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. कोर्ट केसेस सोडवण्यात यशस्वी व्हाल. निःपक्षपाती राहणे महत्त्वाचे आहे. जुने वाद मिटवण्यासाठी चांगला काळ आहे, मात्र सावधगिरी बाळगा. 

मिथुन (Gemini Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा एक नवीन सुरुवात करणारा ठरणार आहे. काहीतरी नवीन करण्याचे धाडस करा. आयुष्याला नवी दिशा मिळू शकते. मात्र निष्काळजीपणा टाळा. त्याशिवाय जोखीम नीट समजून घ्या आणि मगच कोणताही निर्णय घ्या.

कर्क (Cancer Zodiac) 

या राशीच्या लोकांना या आठवड्यात आत्मनिरीक्षण आणि एकांताची गरज भासणार आहे. तुमचा आतील आवाज ऐका आणि तुमचे ध्येय समजून घ्या. मानसिक शांती मिळवण्याची हीच वेळ असणार आहे.

सिंह (Leo Zodiac)

या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढणार आहे. तुम्हाला नेतृत्वाची भूमिका मिळू शकते. व्यवसायात प्रगतीचे संकेत आहेत. पण, इतरांच्या भावनाही लक्षात द्या. तुमचे नेतृत्व इतरांना प्रेरणादायी ठरणार आहे. 

कन्या (Virgo Zodiac)   

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा पैसा आणि मालमत्तेच्या बाबतीत चांगला राहणार आहे. कुटुंबात स्थिरता आणि समतोल असणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवा आणि आनंदाचे क्षण तयार करा. 

तूळ (Libra Zodiac) 

या आठवड्यात या राशीच्या लोकांच्या नात्यात समज आणि समन्वय वाढणार आहे. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या जोडीदाराशी किंवा जवळच्या व्यक्तीशी संपर्क साधा. परस्पर विश्वास दृढ होणार आहे. एकत्र निर्णय घेणे चांगले परिणाम मिळतील. 

वृश्चिक (Scorpio Zodiac) 

हा आठवडा या राशीच्या लोकांसाठी बदलांनी भरलेला असणार आहे. जुन्या परिस्थितीत अचानक बदल होणार आहे. हे कठीण वाटेल, मात्र शेवटी ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. नवीन सुरुवात करण्याची वेळ आली आहे. हे तुम्हाला जुन्या भीतीपासून मुक्त करणार आहे. 

धनु (Sagittarius Zodiac)

या राशीच्या लोकांनी या आठवड्यात थांबून विचार करावा आणि आपला दृष्टीकोन बदला. गोष्टी नवीन पद्धतीने पहा. परिस्थिती स्थिर राहणार नाही, मात्र हे बदल भविष्यात तुमच्यासाठी चांगले सिद्ध होणार आहे.

मकर (Capricorn Zodiac)  

या आठवड्यात या राशीचे लोक त्यांच्या कठोर परिश्रमाने आणि इच्छाशक्तीच्या जोरावर मोठी उद्दिष्टे साध्य करणार आहे. तुमचे नेतृत्व आणि स्पष्ट ध्येये तुम्हाला यश प्राप्त करण्यास मार्ग मोकळा होणार आहे. कोणत्याही संघर्षात विजय मिळेलच. फक्त तुमचा फोकस ठेवा. 

कुंभ (Aquarius Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा स्थिर राहणार आहे. कामाच्या ठिकाणी कोणतेही मोठे बदल होणार नाहीत, मात्र ते समतोलपणे आपले काम चालू ठेवा. आर्थिक बाबतीत सावध राहा. त्याशिवाय अनावश्यक खर्च टाळा.

मीन  (Pisces Zodiac) 

या राशीच्या लोकांना या आठवड्यात कामातून विश्रांती घ्यावी लागणार आहे. जास्त कामाच्या ओझ्यामुळे तणाव वाढणार आहे. त्यामुळे विश्रांतीसाठी वेळ काढा. तुम्ही एखादा नवीन प्रकल्प सुरू करण्याचा विचार करत असाल, तर चांगली योजना घेऊन पुढे जा.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती टॅरो कार्डवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)