Kumbh: चेंगराचेंगरीत मेलेल्यांचे मृतदेह...महाकुंभच्या पाणी प्रश्नावर बोलताना खासदार जया बच्चन यांचे धक्कादायक विधान

Jaya Bachchan On Kumbh Water: महाकुंभबद्दल काय म्हणाल्या जया बच्चन? जाणून घेऊया. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 3, 2025, 05:36 PM IST
Kumbh: चेंगराचेंगरीत मेलेल्यांचे मृतदेह...महाकुंभच्या पाणी प्रश्नावर बोलताना खासदार जया बच्चन यांचे धक्कादायक विधान title=
जया बच्चन

Jaya Bachchan On Kumbh Water: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज महाकुंभमध्ये मौनी आमवस्येच्या दिवशी झालेल्या चेंगराचेगीत 30 भाविकांना जीव गमवावा लागला. यानंतर देशातील वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन या आपल्या विधानामुळे वादात सापडल्या आहेत. महाकुंभबद्दल काय म्हणाल्या जया बच्चन? जाणून घेऊया. 

काय म्हणाल्या जया बच्चन?

सध्या लोकसभेत जलशक्ती विभाग घाणेरड्या पाण्यावर चर्चा करत आहे. सध्या सर्वात जास्त प्रदूषित पाणी कुठे आहे? ते कुंभमध्ये आहे. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह नदीत फेकण्यात आले आहेत. त्यामुळे पाणी प्रदूषित झाल्याचे जया बच्चन म्हणाल्या. खऱ्या समस्यांकडे लक्ष दिले जात नाही.मृतदेह गंगेत टाकले गेले आणि तेच पाणी लोकांपर्यंत पोहोचत असल्याचे त्या म्हणाल्या. 'कुंभात येणाऱ्या सामान्य लोकांना कोणत्याही विशेष सुविधा मिळत नाहीत, त्यांच्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी कुंभमध्ये डुबकी घेतल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले. पण सरकारची आकडेवारीही खोटी असल्याचे खासदार जया बच्चन म्हणाल्या. कोट्यवधी लोक त्या ठिकाणी आले आहेत, हे खोटे आहे. इतक्या मोठ्या संख्येने लोक तिथे कसे जमू शकतात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

'घटनेचे सत्य देशातील जनतेला कळू द्या'

व्हीआयपी लोक कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी जातात त्यांना विशेष वागणूक मिळते. त्यांचे फोटो बाहेर येतात. पण गरीब लोक, सामान्य लोकांसाठी कोणतीही मदत नाही आणि कोणतीही व्यवस्था नसल्याचे खासदार जया बच्चन यांनी लोकसभेत सांगितले. जे पाणी तुम्हाला हवंय ते सर्वात दूषित पाणी आहे. कुंभमेळ्यात काय घडलं ते लोकांना खरं सांगा. याबद्दल सभागृहात बोलले गेले पाहिजे. महाकुंभात घडलेल्या घटनेचे सत्य देशातील जनतेला कळू द्या. यासंदर्भात तपास सुरूच आहे. कुंभमेळ्यात जे काही घडत याची चौकशी करण्याची गरज असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.

राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता

जया बच्चन यांच्या या विधानामुळे राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महाकुंभातील कथित 'गैरव्यवस्थापन'च्या मुद्द्यावर त्वरित चर्चा करण्याची मागणी करत विरोधी पक्षांनी सोमवारी राज्यसभेत प्रचंड गोंधळ घातला. अध्यक्षांनी त्यांची मागणी फेटाळल्यानंतर ते प्रथम शून्य प्रहरात आणि नंतर प्रश्नोत्तराच्या तासात सभागृहाबाहेर पडले. मौनी अमावस्येच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक महाकुंभात पोहोचले होते. यावेळी चेंगराचेंगरी झाली होती.  या चेंगराचेंगरीत अनेक लोक मृत्युमुखी पडले आणि अनेकजण जखमीही झाले होते.