शाहरुख खान वडिलांबद्दल म्हणतो 'Most Sucessful Failure'! असं का? 'ही' आहेत कारणं

शाहरुख खान नेहमीच आपल्या आई-वडिलांबद्दल खूप आदर आणि प्रेम व्यक्त करतो. त्याच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे त्याचे वडील, मीर ताज मोहम्मद खान. शाहरुख नेहमीच आपल्या वडिलांबद्दल बोलताना एक खास व्यक्तिमत्त्व दाखवतो.  

Intern | Updated: Feb 3, 2025, 04:57 PM IST
शाहरुख खान वडिलांबद्दल म्हणतो 'Most Sucessful Failure'! असं का? 'ही' आहेत कारणं title=

Shah Rukh Khan's Father: एका मुलाखतीत शाहरुख खानने आपल्या वडिलांना 'Most Sucessful Failure' म्हटले होते. अनुपम खेरच्या शोमध्ये याबद्दल विचारले असता, शाहरुखने त्याच्या वडिलांच्या संघर्षांची कहाणी सांगितली. मीर ताज मोहम्मद खान हे एक वकील होते, पण त्यांनी वकिलीची प्रॅक्टिस सुरू ठेवली नाही. त्यांना वाटले की ते त्या क्षेत्रासाठी योग्य नाहीत. त्यांच्या जीवनात अनेक उतार-चढाव आले, तरीही ते कधीही हार मानले नाहीत. शाहरुखने सांगितले की ते कदाचित देशातील सर्वात तरुण स्वातंत्र्यसैनिक असावेत. याबाबतचा ताम्रपट त्याला मिळाला आहे. वयाच्या 14-15व्या वर्षी ते तुरुंगात गेले होते आणि त्याला असे वाटते की, मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, जिथे त्यांचा पराभव झाला.

त्यानंतर, मीर ताज मोहम्मद खान यांनी एकापाठोपाठ अनेक व्यवसाय सुरू केले, पण सर्वातच अयशस्वी ठरले. त्यांनी फर्निचर व्यवसाय सुरु केला त्यात ते अपयशी ठरले, त्यानंतर त्यांनी वाहतूक व्यवसाय सुरु केले तोही अपयशी ठरु लागला आणि शेवटी त्यांनी एक रेस्टॉरंट सुरू केले, परंतु हा ही व्यवसाय चालला नाही. त्याचा शेवटी स्वातंत्र्यसैनिक एक छोटी जागा दिली जाते, त्यांना ही एक जागा मिळाली ती म्हणजे दवाखान्याचा मागे तिथे ते चहा विकायचे. शाहरुखने आपल्या वडिलांच्या मेहनतीचा आदर व्यक्त करत सांगितले की, 'ते खूप शिकलेले होते  एमए आणि एलएलबी असतानाही ते कधीही राजकारणात जाऊ इच्छित नव्हते. त्यांनी स्वातंत्र्यसैनिक असलेल्या त्यांच्या कर्तव्यातून काधीही फायदा घेण्याचा विचार केला नाही. ते केवळ प्रामाणिक होते.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

शाहरुखने आपल्या वडिलांची अनेकदा प्रशंसा केली आहे, कारण त्यांच्या जीवनात एक प्रकारचा आत्मविश्वास आणि संघर्ष होता, जो त्याच्या व्यक्तिमत्त्वावर प्रगट होतो. मीर ताज मोहम्मद खान हे एक उंचवट्यांवर पोहोचलेले, पण तरीही साधे आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या संघर्षाची आणि यशापयशाची कहाणी शाहरुखच्या जीवनावर मोठा प्रभाव टाकली आहे. 

हे ही वाचा: 'कोई मिल गया'तील जादूच्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या मनात राहिली खंत, 'मन जिंकले पण ओळख मिळेना'

मीर ताज मोहम्मद खान यांचे 1981 मध्ये कर्करोगाने निधन झाले. शाहरुख खानच्या आयुष्यात त्यांचे योगदान अनमोल होते. त्यांच्या पत्नी फातिमा खान यांच्यासोबत त्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पार केली. शाहरुखच्या यशाच्या मागे त्याच्या वडिलांचा संघर्ष आणि धैर्य मोठा प्रेरणा स्त्रोत ठरला आहे.