महाकुंभातील स्नानांचे महत्त्व काय? 'या' दोनच दिवशी महास्नानाचा सुर्वण योग

  महाकुंभमध्ये त्रिवणी संगमावर ब्रह्ममुहूर्तात अमृत स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मुक्ति मिळते. वंसंत पंचमीला तिसरे अमृत स्नान संपन्न झाले. आता काही दिवसानंतर माहास्नानाची सुवर्ण संधी येत आहे. या विषयी सविस्तर आत्ताच जाणून घ्या.

Updated: Feb 3, 2025, 06:27 PM IST
महाकुंभातील स्नानांचे महत्त्व काय? 'या' दोनच दिवशी महास्नानाचा सुर्वण योग title=

Kumbh Mela 2025: हिंदू पौराणिक कथेनुसार, देव आणि दानवांनी अमृत (अमरत्वाचे अमृत) काढण्यासाठी समुद्रमंथन केले. अमृतासाठी त्यांच्यात घनघोर युद्ध झाले आणि संघर्षाच्या दरम्यान प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन या चार ठिकाणी अमृताचे थेंब पडले. ही ठिकाणे कुंभमेळ्याची पवित्र स्थळे बनली. सर्वात महत्त्वाच्या आध्यात्मिक मेळाव्यांपैकी एक कुंभमेळा यावर्षी 13 जानेवारी 2025 पासून 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत आयोजित करण्यात आला. दर 12 वर्षांनी होणारा हा भव्य कार्यक्रम लाखो भाविक, संत आणि पर्यटकांना आकर्षित करतो. फक्त भारतातीलच नाही तर विदेशातील पर्यटक सुद्धा या मेळ्यात सहभागी होतात.

अमृत स्नान

महाकुंभातील पहिले अमृत स्नान मकर संक्रांतीच्या दिवशी संपन्न झाले. तर दुसरे अमृत स्नान मौनी अमावस्येदिवशी पार पडले. तर तिसरे आणि शेवटचे अमृत स्नान वसंत पंचमीच्या निमित्ताने केले जाते. दुर्मिळ ग्रहांच्या संगमामुळे यंदाचा महाकुंभ आणखी महत्त्वाचा आहे. अतिशय शुभ मानल्या जाणाऱ्या या विधीमध्ये तेरा आखाडे (पंथ) सामील झाले होते.

तिसरे अमृत स्नान

या महाकुंभातील महत्त्वाची बाब म्हणजे 'अमृत स्नान'. कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्रिवणी संगमावर ब्रह्ममुहूर्तात अमृत स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो. तसेच मुक्तिचा मार्ग मिळतो. हिंदू धर्मानुसार कुंभमेळ्यातील तीन अमृत स्नानांना खूप महत्त्व आहे. त्यापैकी एक अमृत स्नान वसंत पंचमीच्या दिवशी असतो. माघ शुद्ध पंचमी तिथीला वसंत पंचमी म्हणतात. वसंत पंचमीच्या दिवशी वस्त्रदान आणि गौदानालासुद्धा विशेष महत्त्व आहे. या दिवशी दान धर्म केल्याने माता सरस्वतीचा आशीर्वाद लाभतो. तिसऱ्या अमृत स्नानाच्या निमित्ताने भाविकांनी त्रिवेणी संगम ताटांवर गर्दी केली केली होती.

हे ही वचा: ममता कुलकर्णीला होती राज्यसभेची ऑफर? मुंबईत पळून येण्याची वेळ का आली? धक्कादायक खुलासा!

महास्नानांचा सुवर्ण योग

जर महाकुंभातील अमृत स्नानाचा लाभ घेता आला नसेल तर तुम्ही चौथे महास्नानदेखील करू शकता. या महास्नानालासुद्धा खूप महत्त्व आहे. चौथे महास्नान माघ पौर्णिमेच्या दिवशी बुधवार, 12 फेब्रुवारी 2025 रोजी केले जाईल. महाकुंभाचे शेवटचे महास्नान महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच 26 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून गंगाजळाने शिवलिंगाची पूजा केली जाते. असे केल्याने विशेष पुण्य मिळते अशी मान्यता आहे.

(Disclaimer: सदर लेख ज्योतिष शास्त्रावर आणि सामन्या ज्ञानावर आधारित असून झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)