ममता कुलकर्णीला होती राज्यसभेची ऑफर? मुंबईत पळून येण्याची वेळ का आली? धक्कादायक खुलासा!

Mamta Kulkarni's News: बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या जोरदार चर्चेत आहेत. एका मुलाखतीमध्ये ममता कुलकर्णीने बिहार आणि लालू यादव यांच्याबद्दल अनेक गोपनीय आणि थरकाप उडवणारे खुलासे केले आहेत, जाणून घेऊयात सविस्तर. 

Intern | Updated: Feb 3, 2025, 06:04 PM IST
ममता कुलकर्णीला होती राज्यसभेची ऑफर? मुंबईत पळून येण्याची वेळ का आली? धक्कादायक खुलासा! title=

Mamta Kulkarni On Lalu Yadav: बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या चर्चेत आहे तिने एका मुलाखतीत बिहार संबधित काही गोष्टी सांगितल्या आहेत. ममता कुलकर्णी म्हणाली, 'मी गोव्यात एका कार्यक्रमासाठी गेले होती आणि अचानक मला सांगण्यात आले की बिहारला जायचं आहे. मी आणि माझ्या 10 जणांची टीम विमानाने बिहारला पोहोचलो. मला बिहारबद्दल काहीच माहित नव्हते आणि त्यावेळी लालू यादव यांचे नावही मला माहित नव्हते.' ममता कुलकर्णीने बिहारच्या त्या अनुभवाबद्दल सांगितले की, तेथे पोहोचल्यावर तिला अणि तिच्या टीमला अनेक गोष्टी घाबरवणाऱ्या होत्या. तिथे जात असताना तिच्या हेयरड्रेसरला काही गोष्टी घ्यायच्या होत्या. तर तिने गाडी चालकाला थांबायला सांगितल्यावर तिच्या सचिवाने तिला सांगितले की, 'तुम्ही इथे थांबू शकत नाही, हा नक्षलग्रस्त भाग आहे.' 

त्यानंतर, ममता कुलकर्णी म्हणाली की, 'हॉटेलमध्ये गेल्यावर अधिकारी रांगेत उभे होते आणि 100 पोलीस AK-47 घेऊन तिथे उभे होते, जणू ते युद्धासाठी तयारी करत होते. खोलीतही अनेक लोकं होती, जणू 5000 लोक आत बसले होते'.  तासाभरानंतर शोमध्ये पोहोचलो तेव्हा ड्रेसिंग रूमही भरलेली होती. मी सेक्रेटरीला फोन करून विचारले की बिहारमध्ये शो करायला कोणी सांगितले? मी तिथून माझ्या टीमसोबत कसेतरी निघून विमानतळावर पोहोचलो. ममता कुलकर्णी पुढे म्हणाली 'मी विमानतळावर पोहोचल्यावर तिच्या मनात एकच विचार होता, 'कधी फ्लाइट येईल आणि आम्ही परत कसे जाऊ' 

ममता कुलकर्णीने मोठा खुलासा करत सांगितले की, 'त्यावेळी मला लालू यादव कोण हे माहित नव्हते. मला सांगण्यात आले की ते बिहारचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी मला राज्यसभेची ऑफर दिली होती.' परंतु ममता कुलकर्णीने स्पष्टपणे सांगितले की तिने राजकारणात प्रवेश करण्याचे ठरवले नव्हते आणि भविष्यात ती राजकारणात कधीही जाणार नाही. 

हे ही वाचा: शाहरुख खान वडिलांबद्दल म्हणतो 'Most Sucessful Failure'! असं का? 'ही' आहेत कारणं

ममता कुलकर्णी यांनी साध्वी जीवन स्वीकारल्याच्या निर्णयावरूनही बरीच चर्चा झाली आहे. त्याआधी, प्रयागराज महाकुंभमध्ये तिला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर बनवण्यात आले होते. पण या पदावर काही वाद निर्माण झाल्यानंतर तिला त्या पदावरून हटवण्यात आले. 

ममता कुलकर्णीने सिनेविश्वातून निरोप घेतल्यानंतर साध्वी जीवन स्वीकारले आणि तिने राजकीय खुलासा केल्यामुळे बिहारमध्ये राजकीय वातावरण तणावपूर्ण झालं आहे.