महिलांसाठी वरदान आहेत 'या' बिया, अनेक गंभीर आजारांवर रामबाण औषध

महिलांच्या अनेक रोगांच्या निवारणासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी भोपळ्याच्या बिया रामबाण उपाय ठरल्या आहेत.

Updated: Jan 9, 2025, 05:57 PM IST
महिलांसाठी वरदान आहेत 'या' बिया, अनेक गंभीर आजारांवर रामबाण औषध title=

Benefits of Pumpkin Seeds: आजच्या या धावपळीच्या जीवनात आपण आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. खास करुन महिलांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. बऱ्याचशा महिला वयानुसार विविध आजारांनी ग्रासलेल्या असतात. मात्र, या रोगांच्या निवारणासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी भोपळ्याच्या बिया रामबाण उपाय ठरल्या आहेत. या भोपळ्याच्या बिया महिलांसाठी एका वरदानापेक्षा कमी नाही, असं म्हटलं तरी गैर नाही. भोपळ्याच्या या छोट्या बिया महिलांच्या स्वास्थ्यासाठी मात्र खूपच फायदेशीर मानल्या जातात. या बिया फक्त शारिरीक आजारांवरच नव्हे तर प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत. कारण या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात शरीरासाठी पोषक असणारी तत्वे असतात. विशेषत: पीसीओएस (PCOS) सारख्या समस्यांना दूर ठेवण्यासाठी भोपळ्याच्या बिया अत्यंत फायदेशीर असतात. 

भोपळ्याच्या बियांमध्ये झींक (Zn) आणि मॅग्नेशियम (Mg) मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे शरीरातील होर्मोन्स नियंत्रित ठेवण्यास मदत होते. पीसीओएस सारख्या आजारात शरीरातील होर्मोन्सचे संतुलन ढासळते ज्यामुळे वजन वाढणे, अनियमित मासिक पाळी आणि तोंडावरील मुरुम यांसारख्या समस्या उद्भवतात. परंतु, रोज एक चमचा भोपळ्याच्या बिया खाल्याने या समस्यांपासून सुटका मिळवण्यास मदत होते. 

लठ्ठपणावरील उत्तम उपाय

लठ्ठपणा कमी करण्यासाठी भोपळ्याच्या बिया अत्यंत उपयोगी मानल्या जातात. या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि प्रोटीन असते. यांच्या सेवनाने वारंवार भूक लागत नाही आणि यामुळेच या बिया वजन कमी करण्यास उपयुक्त ठरतात. याव्यतिरिक्त, भोपळ्याच्या बियांमुळे शरीरातील मेटाबॉलिजम सुद्धा वाढते जेणेकरुन शरीरातील अधिक चरबी कमी करण्यास मदत होते.  

हृदय आणि हाडांसाठी उपयुक्त

भोपळ्याच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड आणि मॅग्नेशियम अधिक प्रमाणात असते आणि हृदयाच्या स्वास्थ्यासाठी खूपच फायदेशीर असतात. यांच्या सेवनाने रक्तप्रवाह सुरळीत राहतो तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा मदत होते. भोपळ्याच्या बियांमधील मॅग्नेशियमचे प्रमाण आधिक असल्यामुळे हाडे मजबूत होतात आणि फ्रॅक्चर तसेच ऑस्टियोपोरोसिससारख्या समस्यांना सुद्धा दूर ठेवता येते. 

भोपळ्याच्या बिया खाण्याची योग्य पद्धत

कच्च्या भोपळ्याच्या बियांचे सेवन करु शकता तसेच त्या भाजून सुद्धा खाऊ शकता. सकाळी उपाशीपोटी भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने त्याचा शरीराला अधिक फायदा होतो. आवश्यकतेनुसार, तुम्ही या बियांचा समावेश सॅलेड, दही किंवा स्मूदी यामध्ये करु शकता.