Men’s Secrets: पुरुष नेहमी आपल्या पार्टनरपासून लपवतात 'या' 3 गोष्टी

पुरुष प्रत्येक गोष्ट त्यांच्या जोडीदारांसोबत शेअर करत नाहीत.

Updated: Aug 8, 2022, 11:30 AM IST
Men’s Secrets: पुरुष नेहमी आपल्या पार्टनरपासून लपवतात 'या' 3 गोष्टी title=

मुंबई : जेव्हा जोडपं रिलेशनशिपमध्ये येतात तेव्हा ते एकमेकांशी प्रत्येक गोष्टीबद्दल बोलतात. मुली त्यांच्या आयुष्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट त्यांच्या प्रियकर किंवा नवऱ्याला सांगतात. त्याचप्रमाणे पुरुष देखील त्यांच्या मनापासून ते त्यांच्या पत्नी किंवा मैत्रिणीपर्यंत प्रत्येक गोष्टीबद्दल बोलतात. मुलींना असं वाटतं की, त्यांचा पार्टनर त्यांच्यासोबत सर्व काही शेअर करतो. पण प्रत्येक नात्यात अनेक गुपितंही असतात. 

पुरुष प्रत्येक गोष्ट त्यांच्या जोडीदारांसोबत शेअर करत नाहीत. मुलांशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या ते आपल्या पार्टनरला कधीच सांगू शकत नाहीत. जर तुम्हाला असंही वाटत असेल की तुम्हाला पती किंवा प्रियकराच्या आयुष्याशी संबंधित सर्व काही माहित आहे, तर तो तुमचा गैरसमज असू शकतो. पुरुषांच्या आयुष्याशी संबंधित अशी अनेक रहस्यं आहेत, जी तो नेहमीच महिलांपासून लपवतो. 

जाणून घ्या पुरुषांशी संबंधित अशी रहस्यं, जी मुलं मुलींशी बोलण्यास कचरतात.

वेदना किंवा आजाराचं दुखणं

अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग आहे, 'मर्द को कभी दर्द नहीं होता'. पण पुरुषही माणूसच असतो आणि त्यांनाही वेदना होतात. बहुतेक पुरुष इतरांसमोर, विशेषतः त्यांच्या जोडीदारासमोर वेदना व्यक्त करत नाहीत. जर त्याला दुखापत झाली असेल, तर तो त्याच्या जोडीदारासमोर त्याच्या वेदना किंवा कोणतीही दुःखद गोष्ट व्यक्त करताना खूप भावनिक होत नाही.

भीती

मुलांना लहानपणापासूनच शिकवलं जातं की, घाबरू नका, रडू नका. मुलं मोठी झाल्यावर त्यांना ज्याची भीती वाटते ते लपवू लागतात किंवा त्यांनाही भीती वाटते. भीती हे दुर्बलतेचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे पुरुष आपल्या जोडीदाराच्या कितीही जवळचे असले तरी त्यांना भीती वाटते हे त्यांना कळू देत नाही.

इम्प्रेशन

स्त्रियांनी आपल्याकडे लक्ष द्यावं अशी प्रत्येक पुरुषाची इच्छा असते. पण पुरुष हे कधीच मान्य करत नाहीत. मुलींना सुंदर दिसायचं असतं हे सर्वांना माहीत आहे आणि जेव्हा लोक त्यांची स्तुती करतात तेव्हा मुलींना ते आवडतं. पण हीच गोष्ट पुरुषांना लागू होते.