non-vegetarian AND vegetarian News In Marathi : जगभरात नॉनव्हेजपेक्षा व्हेज खाणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. कारण शाकाहारी जेवण हे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. तर दुसरीकडे अनेकांना मांसाहारी जेवण आवडते. चिकण, मटण, फिश खाणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. ते एकप्रकारे याचे दिवानेच असतात. आठवड्यातून दोन ते तीन दिवस याचा आस्वाद घेत असतात. अनेकांना असे वाटते की, मांसाहार खाल्लाने शक्ती वाढते, असा त्यांचा समज असतो. मांसाहार करण्याचे प्रमाण हिवाळ्यात अधिक वाढते. अशीच एक आकडेवारी समोर आली असून ज्यामध्ये शाकाहारी की मांसाहारी खाणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
राष्ट्रीय परिवार स्वास्थ या संस्थेने मांसाहारी की शाकाहारी खाणाऱ्यांची संख्या अधिक आहे? याचा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार 57.3 टक्के पुरुष आणि 45.1 टक्के महिला आठवड्यातून किमान एकदा चिकन, मासे किंवा मासंहारी पदार्थ खातात. हा आकडा शहरी भागातील खेड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांपेक्षा जास्त आहे. शहरी भागातील सुमारे 60 टक्के पुरुष आणि 50.8 टक्के महिला आठवड्यातून किमान एकदा तरी मांसाहारी पदार्थ खात आहेत.
या सर्व्हेनुसार, ख्रिश्चन लोकांमध्ये इतर कोणत्याही धर्मापेक्षा जास्त मांसाहारी पदार्थाचे सेवन केले जाते. सुमारे 80 टक्के ख्रिश्चन पुरुष आणि 78 टक्के ख्रिश्चन महिला आठवड्यातून किमान एकदा तरी मांसाहारी पदार्थाचे सेवन करतात. त्या तुलनेत केवळ 79.5 आणि 70.2 टक्के मुस्लिम स्त्री-पुरुष आणि 52.5 आणि 40.7 टक्के हिंदू स्त्री-पुरुष मांसाहार करतात.
मांसाहार करणाऱ्यांची सर्वाधिक लोकसंख्या पूर्व, दक्षिण आणि पश्चिम भारतात आहे. गोवा, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये, 80 टक्क्यांहून अधिक पुरुष लोकसंख्या आठवड्यातून किमान एकदा मांस, चिकन किंवा इतर प्रकारचे मांस खातात. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा आणि तामिळनाडूमध्ये 50 टक्क्यांहून अधिक पुरुष लोक आठवड्यातून एकदा मांसाहारी पदार्थाचे सेवन करतात. भारत हा मांसाचा सर्वात मोठा निर्यातदार आहे. कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणानुसार, भारतातून 71 देशांमध्ये म्हशीचे मांस निर्यात केले जाते.
आर्थिक वर्ष 2023 मध्ये 25,648 कोटी रुपयांच्या म्हशीच्या मांसाची निर्यात झाले. आर्थिक वर्ष 2012 मध्ये हा आकडा 13,757 रुपये असेल. यातील सर्वाधिक निर्यात दोन देशांमध्ये गेली. ते देश मलेशिया आणि व्हिएतनाम आहेत. इतर प्रमुख निर्यातदार देशांमध्ये इजिप्त, इंडोनेशिया, इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, फिलीपिन्स आणि हाँगकाँग यांचा समावेश होतो.