Coronavirus Latest News Today : साधारण 2019 च्या अखेरीस कोरोना विषाणूनं चीनवाटे (China) संपूर्ण जगात थैमान घालण्यास सुरुवात केली. चीनच्या वुहान (Wuhan) शहरात कोरोनानं हातपाय पसरले आणि बघता बघता संपूर्ण जगाला या विषाणूनं विळख्यात घेतलं. हे संकट लसीकरणानंतर (Corona Vaccination) तरी टळेल अशी शक्यता असतानाच तसं काहीच होताना दिसलं नाही. आता सलग चौथ्या वर्षात म्हणजेच 2023 मध्येही हा विषाणू अचडणींची परिस्थिती निर्माण करणार असल्याची चिन्ह आहेत. जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO नं यासंदर्भातील इशाराही दिला आहे.
WHO चे महासंचालक टेड्रोस अदनोम घेब्येयियस यांनी शुक्रवारी कोरोनासंदर्भात काही गोष्टी सांगत पुन्हा जगाचं लक्ष वेधलं. यंदाच्या वर्षी COVID-19 ला थोपवण्याच्या रणनितींमध्ये दिसून आलेल्या एका त्रुटीमुळे एका नव्या व्हेरिएंटच्या निर्मितीची स्थिती तयार करत आहे. सध्याच्या घडीला (Corona precautions) नियमांमध्ये आलेली शिथिलता, लसीकरणाविषयी नसणारं गांभीर्य आणि तत्सम परिस्थितीमुळं हे संकट ओढावू शकतं असतं मत जागतिक आरोग्य संघटनेकडून मांडण्यात आलं.
'या महामारीची धोकादायक पातळी आता संपुष्टात येण्यच्या मार्गावर आहे असं म्हणण्याच्या आपण बरेच जवळ आहोत. पण, अद्यापही आपण तिथपर्यंत पोहोचलेलो नाही', असं म्हणत त्यांनी आपल्या वक्तव्यावर जोर दिला. लसीकरणामध्ये जागतिक स्तरावर असणाऱ्या अंतराविषयी सांगत चीनसोबतच संपूर्ण जगात सहव्याधी असणाऱ्या आणि 60 वर्षांहून अधिक वय असणाऱ्या नागरिकांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात आरोग्य संघटनांनी जावं असा आग्रही सूर टेड्रोस यांनी आळवला.
"WHO estimates that at least 90% of the world’s population now has some level of immunity to SARS-CoV-2, due to prior infection or vaccination. We are much closer to being able to say that the emergency phase of the pandemic is over – but we’re not there yet"-@DrTedros #COVID19
— World Health Organization (WHO) (@WHO) December 2, 2022
कोविडचं परीक्षण, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीच्या नियमांमध्ये आलेली शिथिलता दिलासा देणारी असली तरीही त्याला चिंतेची किनारही आहे. कारण मोठ्या प्रमाणात असणाऱ्या सामाजिक अशांततेचे थेट परिणाम विषाणूमधील बदलांमध्ये दिसतील ही बाब नाकारता येत नाही.
कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूची मागील आठवड्यात वर्षपूर्ती झाली. संपूर्ण जगात या विषाणूची दहशत पाहायला मिळाली. यामध्ये WHO प्रमुखांनी ओमायक्रॉन हा डेल्टाहून अधिक झपाट्यानं पसरणारा व्हेरिएंट असल्यासं स्पष्ट केलं.