मुंबई : 'निपाह' या व्हायरसमुळे सध्या केरळ राज्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या अज्ञात इन्फेक्शनमुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संस्थेने निपाह व्हायरसमुळे हाय अलर्ट घोषित केला आहे. पुण्यातील नॅशनल इंस्टिस्ट्युड ऑफ वायरॉलॉजीने ३ नमुन्यांची तपासणी केल्यानंतर 'निपाह' व्हायरस असल्याची घोषणा केली आहे. मनिपाल यूनिवर्सिटी इपीडेमियोलॉजी विभागानुसार. निपाह व्हायरस लाळेतून पसरतो. निपाह व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीपासून दूर रहा. तसंच प्राण्यांकडून माणसांकडेही हा व्हायरस अतिशय सहज पसरतो.
केरळमध्ये पसरलेल्या निपाह व्हायरसचा इतर ठिकाणी धोका नसला. तरी बचावात्मक उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे केरळवरुन येणारी फळे खाणे टाळा. फळे खाताना स्वच्छ धुवूनच खा. खजूर, आंबा धुवून खा. रमजानचा महिना सुरु आहे त्यामुळे केळी, खजूर ही फळे केरळमधून मोठ्या प्रमाणात आयात केली जातात. मात्र केरळमध्ये निपाह व्हायरसची दहशत पाहता हे खाणे टाळणे अतिशय गरजेचे आहे.