मुंबई : गर्भावस्थेचा काळ हा प्रत्येक महिलेसाठी खास असतो. या काळात महिलांची अधिक काळजी घेणं गरजेचं असतं. मात्र काही महिला कामाच्या ताणामुळे आरोग्यावर जास्त लक्ष देऊन शकत नाहीत. मात्र याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होत असतो. यासाठी आज आम्ही तुम्हाला गरोदर असलेल्या वर्किंग वुमनसाठी काही खास टीप्स सांगणार आहोत.
प्रेंग्नेंसीमध्ये महिलांनी अधिक काम करणं टाळलं पाहिजे. गरोदर महिलांनी आठवड्यात 40 तासांमध्ये अधिक काम करू नये. यामुळे मिस्ककॅरेज होण्याचा धोका वाढतो. शिवाय नाईट शिफ्टमध्येही काम करणं टाळलं पाहिजे. यामुळे झोपेचा पॅटर्न बदलतो आणि ताण वाढू शकतो.
गरोदर महिलांनी कोणत्याही परिस्थितीत ब्रेकफास्ट स्किप करू नये. कामाच्या गडबडीत जर तुम्ही ब्रेकफास्ट स्किप करत असाल तर अशावेळी तुम्ही तुमच्या बॅगेत, फळं, ज्यूस असं ठेवत जा.
एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून काम करणं टाळा. असं केल्यास गर्भधारणेवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कामाच्या दरम्यान ब्रेक घेण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्ही मोकळ्या हवेत थोडा वेळ जाऊ शकता. यामुळे तुम्हाला खूप आरामदायी वाटेल.