कॅल्शियमच्या कमतरतेमुळं 'या' गंभीर आजारांचा धोका; वेळीच ओळखा ही लक्षणे

Calcium Deficiency Symptoms: शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर आरोग्यावरही त्याचा दुष्परिणाम होतो. अशावेळी ही लक्षणे ओळखणे गरजेचे आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 13, 2024, 04:45 PM IST
 कॅल्शियमच्या कमतरतेमुळं 'या' गंभीर आजारांचा धोका; वेळीच ओळखा ही लक्षणे title=
Signs and Symptoms of a Calcium Deficiency in marathi

Calcium Deficiency Symptoms: शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर त्याचा परिणाम आरोग्यावर होऊ लागतो. कॅल्शियमच्या कमतरतेमुळं हाडं ठिसूळ होतात. इतकंच नव्हे तर कॅल्शियम कमी झाल्यास मांसपेशी, रक्तवाहिन्यांना देखील धोका पोहोचतो. तसंच, हार्मोन्स आणि एंजाइम योग्य पद्धतीने रिलीज होण्यास वेळ लागतो. त्यामुळं आरोग्य फिट अँड फाइन ठेवण्यासाठी कॅल्शियमची मात्रा नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते. पण शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे की नाही, हे कसं ओळखाल. 

शरीरात कॅल्शियम कमी झाले तर त्याचे संकेत शरीर आपल्याला देत असते. फक्त ही लक्षणे तुम्हाला ओळखता आली पाहिजेत. त्यामुळं अशी कोणते लक्षणे आहेत हे आज आपण जाणून घेऊया. 

शरीरात कॅल्शियम कमी असल्यास दिसतात ही लक्षणे 

थकवा येणे

जर तुम्हाला सतत थकवा येत असेल किंवा अंगदुखी असेल. त्याचबरोबर शरीर अखडलेले वाटतं असेल तर ही लक्षणे कॅल्शियम कमी असल्याची आहेत. शरीरातील पेशींना योग्य प्रकारे पोषण मिळत नसल्याने कॅल्शियमची कमतरता निर्माण होते. 

ओरल हेल्थ

शरीरात जर कॅल्शियमची कमतरता असेल तर त्यामुळं तुमचे दात आणि हिरड्यांचे आरोग्य खराब होते. इतकंच नव्हे तर. दात किडणे, कमकुवत होणे, संवेदनशील होणे ही सगळी लक्षणेदेखील कॅल्शियम कमी असल्याचे संकेत देतात. 

मांसपेशींमध्ये वेदना

कॅल्शियम हाडांबरोबरच मांसपेशींनादेखील बळकटी देते. मांसपेशी अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी तसंच, रिलॅक्स आणि फ्लॅक्सिबल ठेवण्याचे काम करतात. हायपरकॅल्सिमिया मांसपेशी कमजोर करण्याचे काम करतात. त्यामुळे स्नायूंमध्ये वेदना, कडकपणा आणि पेटके येतात.

मानसिक त्रास

तुमच्या शरीरातील पेशींमध्ये कॅल्शियमची कमतरता असल्यास मेंदूवर ताण येणे, चक्कर येणे, भ्रमिष्ट होणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. अशा प्रकारे त्याचा मानसिक आरोग्यावर झपाट्याने परिणाम होतो. 

बोटं सुन्न होणे

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे त्याचे परिणाम नसामध्येही दिसू लागतात. यामुळे बोटांमध्ये सुन्नपणा जाणवणे किंवा वारंवार मुंग्या येणे ही देखील कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे आहेत.

हृदयाचे आरोग्य

हार्ड रेट कमी होणे हे देखील कॅल्शियम कमी असण्याचे लक्षण आहे. हृदयाचे आरोग्य हे गंभीर लक्षण आहे. त्यामुळं याबाबत लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या. ही लक्षणे टाळण्यासाठी पूरक आहार घ्या. आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करा. 

किती कॅल्शियम गरजेचे

वयाच्या हिशोबाने तुमच्या शरीरात किती कॅल्शियम असावे हे गरजेचे आहे. 19 ते 50 वर्षांच्या व्यक्तींना आणि 70 वर्षांपर्यंतच्या पुरुषांच्या आहारात रोज 1,000 मिलीग्रॅम कॅल्शियमची गरज आहे. तर, 51 वर्षापेक्षा अधिक असेलल्या महिलांना 1,200 मिलीग्रॅम कॅल्शियम घेण्याची आवश्यकता आहे. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)