मुंबई : केस गळणं, टक्कल पडणं या समस्येपासून अनेकजण हैराण असतात. केसगळती थांबण्यासाठी, पुन्हा केस येण्यासाठी हजारो रुपये खर्च केले जातात पण काहीच उपयोग होत नाही. पण एक घरगुती उपाय करुन आपण हे केस परत आणू शकतो. चंदनाच्या तेलाच महत्व आपल्यापैकी अनेकांना माहित नसेल. याच्या सलग 6 दिवसाच्या वापराने केस येण्यास सुरूवात होते.
चंदनाच्या तेलाचा सुगंध केसाच्या मुळात असलेल्या‘ओआर2एटी4’नावाच्या 'स्मेल रिसेप्टर' ला सक्रीय करतं. हे रिसेप्टर नवे केस उगवण्यास मदत करणाऱ्या केराटिन प्रोटीनची मात्रा वाढवते. यामुळे सहा दिवसांच्या आत टक्कलावर केस उगवण्यास सुरूवात होत असल्याचे शोधकर्ता डेविड रीच सांगतात.
मनुष्य आणि प्राणी केवळ नाका तोंडावाटे वायू आत घेतात पण त्यांच्या केसांची मूळ, त्वचा, शुक्राणू आणि आतडे काही निवडक सुगंधिक रसायनांच्या संपर्कात आल्यावर सक्रिय होतात.
शोधकर्ता डेविड रीच यांनी 38 ते 69 वयाच्या पुरूषांच्या डोक्यावरील त्वचेचा अभ्यास केला. त्यांना 6 दिवस चंदनाच्या सुवासाच्या सानिध्यात ठेवलं यामुळे 'केराटिन' प्रोटीनचा स्तर वाढू लागला. यासोबतच नवे केस येण्यास मदत होणारे कित्येक विटामिन आणि हार्मोन्सदेखील सक्रिय झाले.
या संशोधनाचे परिणाम 'जर्नल नेचर कम्युनिकेशन्स' च्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अंकात दिले गेले आहेत. सलग सहा दिवस चंदन तेलाच्या वापरामुळे केसांच्या मुळातील 'स्मेल रिसेप्टर' सक्रिय होतात. 'केराटिन' प्रोटीनचे उत्पादन वाढून नवे केस निर्माण होतात आणि 6 दिवसात फरक जाणवायला सुरूवात होते.