मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी जगभरात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. अशातच कोरोनाची लागण झाल्यानंतर शरीरात तयार होणाऱ्या इम्यूनिटीमुळे (Immunity) कोरोनापासून बचाव होण्यास मदत होते, असं तज्ज्ञांचं मत आहे. एंटीबॉडीज (Antibodies) आणि इम्यूनिटी यावर वेळोवेळी रिसर्च करण्यात आले आहेत. याचसंदर्भात नुकतंच अमेरिकेत एक संशोधन करण्यात आलं आहे.
या संशोधनात कोरोनाची लागण झालेल्या व्यक्ती आणि लसीकरण झालेले यांचा समावेश करण्यात आला होता. आतापर्यंत संसर्गानंतर लस घेतल्याने निर्माण होणाऱ्या इम्युनिटीला सुपर इम्युनिटी म्हटलं जात होतं. पण लस किंवा संसर्गानंतर की लस घेतल्यानंतर नेमकं कशामुळे एंटीबॉडीज जास्त तयार होतात.
अमेरिकेतील सेंट ज्यूड चिल्ड्रंस रिसर्च हॉस्पिटलमधील 399 लोकांवर हा सर्व्हे करण्यात आला आहे. या रूग्णालयातील असोसिएट फॅक्लटी डॉ. जोश वॉल्फ यांच्या सांगण्यानुसार, लस घेतल्यानंतर तयार होणारी इम्युनिटी आणि कोरोनाची लागण झाल्यानंतर मिळणारी इम्युनिटी यामधील कोणती चांगली आहे हे सांगणं कठीण आहे.
डॉ. जोश पुढे म्हणाले, नेमकी अंटीबॉडीज कोणामुळे अधिक वाढते याचा अंदाज लावणंही कठीण आहे. मात्र रूग्णालयात केलेल्या अभ्यासानंतर हैराण करणारे आकडे समोर आले आहेत.
या अभ्यासातून अखेरीस असं समोर आलं की, ज्या लोकांनी नुकतंच लसीचा डोस घेतला होता त्यांच्यात क्रॉस रिएक्टिव एंटीबॉडीजची (Cross Reactive Antibodies) पातळी जास्त दिसून आली. त्याचप्रमाणे संसर्गानंतर तयार होणाऱ्या एंटीबॉडीजच्या तुलनेत लसीमुळे तयार झालेल्या एंटीबॉडीजची संख्या जास्त चांगली दिसून आली.
त्याचसोबत ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आणि नंतर लस घेतली, त्यांना सर्वोत्तम रोगप्रतिकारशक्ती मिळाल्याचं दिसलं. याला सुपर इम्युनिटी असंही म्हणलं जातात.