शाकाहारी असले तरीही या '5' पदार्थात मांसाहाराचा समावेश !

उपवासाच्या दिवसामध्ये किंवा श्रावण महिन्यामध्ये अनेकजणजर  उपवास करतात.

Updated: Jul 30, 2018, 12:41 PM IST
शाकाहारी असले तरीही या '5' पदार्थात मांसाहाराचा समावेश !   title=

मुंबई : उपवासाच्या दिवसामध्ये किंवा श्रावण महिन्यामध्ये अनेकजणजर  उपवास करतात. वैज्ञानिकदृष्ट्या श्रावण महिन्यात माशांचा प्रजनन काळ असल्याने आणि धार्मिकदृष्ट्या पवित्र महिना असल्याने मासे खाणं किंवा मांसाहार टाळला जातो. मात्र जर तुम्ही धार्मिकदृष्ट्या मांसाहार खाणं टाळणार असाल तर काही पदार्थांबद्दल पुन्हा विचार करा. कारण त्यामध्ये काही अंशी मांसाहाराचा समावेश असू शकतो. 

कोणकोणत्या शाकाहारी पदार्थांमध्ये असतात मांसाहारी घटक ? 

सूप -

हॉटेलमध्ये सूप पिताना त्यामधील घटकांबाबत वेटरकडे विचारणा करा. त्यामध्ये कोणते सॉस मिसळले जातात? हे विचारा. अनेकदा सॉसेसमध्ये माशांचा, फिश ऑईलचा समावेश असू शकतो. 

तेल 

ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडयुक्त तेल शाकाहारी नसतेच. काही तेलांमध्ये व्हिटॅमिन डी घटक असल्याचा दावा केला जातो. मात्र अनेकदा तेलात लेनिलिन घटक असतात. हे प्राण्यामधून काढले जातात. 

व्हाईट शुगर 

पांढरी साखर साफ करताना त्यामध्ये नॅचरल कार्बनचा समावेश केला जातो. यामध्ये प्राण्यांच्या हाडांचा  समावेश केला जातो. त्यामुळे रिफाईंड साखर घेताना काळजी घ्या.  

बियर / वाईन 

मद्य निर्मितीमध्ये इजिनग्लासचा वापर केला जातो. यामध्ये फिश ब्लेडरचा समावेश असतो. 

जॅम 

जेली किंवा जॅमचे तुम्ही शौकिन असाल तर सावध व्हा. कारण जॅममध्ये जिलेटीनचा समावेश असतो. या जिलेटीन बनवतानादेखील प्राण्यांच्या शरीरातील काही घटकांचा समावेश केला जातो.