मुंबई : घराबाहेरील मोबाईल टॉवर्समुळे आरोग्याच्या अनेक समस्यांना समोरे जावे लागते. त्यामुळे ते रहवासी भागापासून दूर असावे, असा नियम करण्यात आला आहे. पण आजकाल घरोघरी वायफाय राऊटर्स असतात. यावर घरातील कम्यूनिकेशन इलेकट्रॉनिक उपकरणं चालतात. पण त्यातून बाहेर पडणारे तरंग हानीकारक असतात. कारण याबद्दलची माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही. इलेकट्रॉनिक उपकरणांचे रेडिएशन रेंज किती असायला हवी, याचे काही प्रमाण नाही. याबद्दल कंपन्या काही माहिती देत नाहीत. किंवा याबद्दल काही सरकारी नियम नाही आहेत.
एनपीएलमध्ये रेडिएशन रेंजवर काम सुरु केले आहे. मोबाईल टॉवरमुळे कमीत कमी नुकसान व्हावे, म्हणून ते दूर लावले जातात. पण घरातील कोपऱ्यात असलेला राऊटरही तितकेच नुकसान करतो. एनपीएसचे सायंटिस्ट डॉक्टर सत्यकेष दुबे यांनी सांगितले की, आमच्याकडे याबद्दलच्या कोणत्याही गाईडलाईन्स नाहीत. हे रेडिएशन्स किती त्रासदायक असतात याचा आम्हालाही अंदाज नाही. जेव्हा काही गंभीर आजार होतात तेव्हा आपण सतर्क होतो. पण पूर्वीपासूनच खबरदारी घेणे गरजेचे आहे.
आजकाल एसी, स्मार्ट टी.व्ही., इंटरनेट, लॅपटॉप, कंप्युटर प्रत्येक इलेकट्रानिक उपकरणं वायफाय किंवा ब्लूटुथ वरुन कंट्रोल होते. एनपीएल याच्या रेडिएशन रेंजची तपासणी केली असता एक मीटरमध्ये हे १५-१७ वॉल्ट रेडिएशन सोडते. तर मोबाईल टॉवर १९ वॉल्ट रेडिएशन सोडते. एनपीएलने टेलिकॉम इंडस्ट्रीने रेडिएशन रेंजच्या स्टॅंडर्डचे प्रस्ताव दिले आहे. यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी आशा आहे.
या रेडिएशन्सचा डोक्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे आपल्या पेशी गरम होतात आणि एका ठराविक कालावधीनंतर त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर दिसू लागतो.