मुंबई : अंडं सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर असलं तरी 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी त्याचे फायदे जास्त आहेत. अंड्यांचं सेवन हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. डॉक्टरही रोज एक अंडं खाण्याचा सल्ला देतात. अंड्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. ज्यामुळे स्नायू बळकट होण्यास मदत मिळते तयार होतात. त्यामुळे खासकरून 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांनी त्यांच्या आहारात अंड्यांचा समावेश केला पाहिजे.
अंड्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. म्हणूनच दररोज एक अंडं खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामध्ये कॅल्शियम, हेल्दी फॅट, कॅलरीज, सोडियम आणि पोटॅशियमचं प्रमाण चांगलं असतं. हे आयर्न, प्रथिनं, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी 6 आणि मॅग्नेशियमचा देखील चांगला स्रोत आहे.
वाढत्या वयाबरोबर महिलांमध्ये हाडं कमकुवत होण्याची समस्या दिसून येते. अशा परिस्थितीत रोज एक अंडे खाणं फायदेशीर ठरू शकते. अंड्यांमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असतं, जे दोन्ही हाडे मजबूत करतात.
वयाच्या 40शी नंतर, चयापचय मंद होऊ लागते. अशा परिस्थितीत आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. रोज एक अंडं खाल्ल्याने तुमची चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते.
अंड हे विटॅमीन आणि मिनरल्सचा उत्तम स्रोत मानलं जातं. डोळ्यांचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी पोषक तत्वंही आवश्यक असतात. अंड्यांमध्ये ल्युटीनसारखे अँटीऑक्सिडंट असतात, जे डोळ्यांच्या रेटिनाला निरोगी ठेवण्यास मदत करतात.
अंडी हा प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. प्रोटीन स्नायू तयार करतात. वाढत्या वयाबरोबर स्नायू कमकुवत होतात, त्यामुळे रोज एक अंडे खाणं फायदेशीर ठरतं.
वाढत्या वयाबरोबर हृदयाशी संबंधित समस्याही उद्भवू लागतात. हृदयाला नेहमी निरोगी ठेवण्यासाठी वयाच्या 40 नंतर रोज एक अंडे खावं. अंड्यांमुळे हृदयाच्या आजारांचा धोका कमी होतो.
अॅनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होके. वाढत्या वयात बहुतेक महिलांना अॅनिमियाच्या समस्येला सामोरं जावं लागतं. हे टाळण्यासाठी महिलांनी आहारात अंड्यांचा समावेश केला पाहिजे. अंड्यांमध्ये आयर्न असतं, ज्यामुळे रक्तपुरवठा सुरळीत होतो.