मुंबई : तुमचंही वजन वाढलंय? तुम्ही प्रयत्न करताय पण काही केल्या वजन कमी होत नाहीये? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण वजन कमी करण्याच्या तुम्ही काही चुका करताय आणि त्यामुळेच तुमचं वजन कमी होत नाहीये. अनावश्यक वजन वाढणं केवळ शरीरासाठी हानिकारक नसतं, तर ते आपल्या व्यक्तिमत्त्वासाठी देखील अयोग्य ठरतं. बहुतांश प्रकरणांमध्ये, आपल्या वाईट सवयी या वजन वाढण्यामागे कारणीभूत असतात. जाणून घेऊया वजन वाढण्याची कारण काय आहेत.
पुरेशी झोप न घेतल्याने वजनात वाढ होते. आहारतज्ज्ञ डॉ. रंजना सिंह सांगतात, की रात्री 7 ते 8 तास झोप न घेतल्यामुळे शरीरात कोर्टीसोल नावाचा हार्मोन तयार होऊ लागतो. यामुळे आपल्याला दिवसभर थकवा जाणवतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, शक्य तितका वेळ शरीराला झोप द्या.
पुरेसं पाणी न पिणं हे वजन वाढवण्यामागील कारण असू शकते. डॉ रंजना सिंह यांच्या म्हणण्यानुसार, आपण दररोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. आपण हे न केल्यास पचनक्रियेचा योग्य पद्धतीने होत नाही आणि आपलं वजन वाढू शकतं. दरम्यान दररोज सकाळी कोमट पाणी पिण्यामुळे वजन कमी होऊ शकतं.
वजन कमी करण्यात चुकीच्या खाण्याच्या सवयी देखील कारणीभूत आहे. जर आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला कोणत्या अन्नातून किती कॅलरी घेतल्या पाहिजेत हे माहित असलं पाहिजे. जरी तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट करत असाल आणि आपण आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरी घेत असाल तरीही आपले वजन कमी होणार नाही.