EVM: राज्यात विधानसभा निवडणुका झाल्यापासून विरोधकांकडून विशेषता संजय राऊतांनी ईव्हीएम वर अनेकदा प्रश्न उपस्थित केलेत. महायुतीच्या विजयात ईव्हिएमचा मोठा वाटा असल्याचे मविआतील प्रत्येक पक्षाने केले.आता कॉंग्रसने ईव्हीएमचा मुद्दा मागे ठेवून वाढलेल्या मताधिक्यावर बोट ठेवलंय. नाना पटोले यांनी मतदार अचानक कसे वाढले असा सवाल उपस्थित केलाय.
राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला..मात्र लोकसभेत मागे पडलेल्या महायुतीने विधानसभेत एवढ मोठं यश कसं मिळवलं, यावरून अनेक आरोप प्रत्यारोप झाले. महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर पराभवाचं खापर फोडण्यात आलं. याबाबत संजय राऊतांनी अनेकदा ईव्हिएमवरचा संशय बोलून दाखवला. ईव्हीएमची मालकी नसल्यामुळे इथल्या लोकशाहीचे आम्ही मालक नाही. निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची हिम्मत फडणवीस यांच्या बॉसेसनी दाखवावी असं राऊत म्हणाले.
तर कॉंग्रेसन आता एक वेगळा मुद्दा अधोरेखीत केलाय... आमचा ईव्हीएमवर नाही तर वाढलेल्या मातधिक्यावर आक्षेप असल्याचं पटोले म्हणालेत.वाढलेले मतदार आले कुठुन असा सवालही त्यांनी उपस्थि केला.
दरम्यान राऊतांची सर्व विधानं चुकीची असतात. ईव्हीएम लोकसभेला चालंत मग विधानसभेला क नाही असा पलटवार मंत्री शंभुराजे देसाई यांनी केलाय.
ईव्हीएम मतदानावर आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी संशय व्यक्त केलाय.राज्यातील विधानसभेनंतर ईव्हीएमवर अनेक आरोप झाले.. आता कॉंग्रसने ईव्हीएमवरून जरा बाजूला होत वाढलेल्या मताधिक्यावर शंका उपस्थित होतीये. ईव्हीएमवर आपला आक्षेपच नसल्याच कॉंग्रेसने म्हंटलय...मात्र वाढलेल्या मतदानावर शंका उपस्थित केलीये. आता वाढलेल्या मतदानावर निवडणूक आयोग काही उत्तर देईल का हे पाहावं लागेल.