History of Mumbai : Dream City, सपनो का शहर, स्वप्ननगरी अशी मुंबईची ओळख. आयुष्यात काबी तरी मोठं करायचं अस स्वप्न घेऊन अनेकजण मुंबईची वाट धरतात. महाराष्ट्राची राजधानी असलेलं मुंबई शहर भारताची आर्थिक राजधानी आहे. मुंबई हे भारतातील सर्वात श्रीमंत शहर आहे. जगभरातील श्रीमंत शहरांच्या यादीतही मुंबईचा समावेश आहे. पण तुम्हाला माहित आहे का भारतात घुसखोरी करणाऱ्या एका राजाला मुंबई शहर लग्नात हुंडा म्हणून मिळाले होते. मात्र, त्याने मुंबई शहर 88 रुपये दरमहा भाड्याने दिले होते. जाणून घेऊया मुंबई शहराचा रंजक इतिहास.
मुंबई हे भारतातील जगप्रसिद्ध शहर आहे. भारतातील 70 टक्के श्रीमंत व्यक्ती मुंबई शहरातच राहतात. अनेक बड्या कंपन्या, मोठे प्रकल्प हे मुंबईतच आहेत. देशाच्या एकूण उत्पन्नात मुंबईचा मोठा वाटा आहे. मुंबईचा इतिहास पाहिला असता मुंबई शहराकडे आधीपासूनच सोन्याचे अंड देणाऱ्या कोंबडी प्रमाणे पाहिले जात होते. यामुळेच मुंबई मिळवण्यासाठी वाट्टेल ते करण्याचा प्रयत्न झाला. भारतात घुसघोरी करणाऱ्या एका राजाने मुंबई वर राज्य करणाऱ्या राजाच्या राजकन्येशी विवाह केला आणि लग्नाच्या हुंड्यात मुंबई शहर मिळवले.
लग्नात हुंडा म्हणून मुंबई मिळवणाऱ्या राजाचे नाव आहे इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स. या राजाच्या लग्नामुळे मुंबईचा इतिहास बदलला. इग्रजांच्या आधी पोर्तुगिज भारतात आले होते. 21 जानेवारी 1509 रोजी सध्या मुंबईचा भाग असेलल्या माहीम येथे पहिल्यांदा पोर्तुगीज जहाजातून उतरले. तेव्हा या भागावर गुजरातच्या सुलतानांच राज्य होत. पोर्तुगीजांनी मोठ्या शिताफीने या बेटांवर वर्चस्व मिळवलं. माहीम मध्ये किल्ला देखील बांधला. सोळाव्या शतकात मुंबई, माहीम, बांद्रा इथे पोर्तुगीजांनी निर्विवाद मालकी मिळवली. पोर्तुगीजांनी या भागाचा विकास करत आपले वर्चस्व दाखवण्यास सुरुवात केली. याच कालखंडादरम्यान भारतात डच आणि इंग्रजांचाही शिरकाव झाला. इंग्रजांनी कलकत्ता, मद्रास, गुजरात मधल्या सुरत इथे आपल्या वखारी उभ्या केल्या. इग्रजांचा डोळा मुंबईवर होता. त्यांनी पोर्तुगीजांकडे हे बंदर विकत देण्याची मागणी केली. मात्र, पोर्तुगीजांनी इंग्रजांचा प्रस्ताव धुडकावून लावला. इंग्रज आणि पोर्तुगीज एकमेकांचे मोठे शत्रू बनले.
मुंबईचे बंदर साम दाम दंड भेद याचा वापर करून आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न इंग्रज करत होते. याचदरम्यान इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स आणि पोर्तुगालची राजकन्या कॅथरीन ब्रिगांझा यांचा विवाह झाला. पोर्तुगालच्या राजाला राजकन्या कॅथरीन ब्रिगांझाचे लग्न स्पेनच्या राजपुत्राशी करून द्यायचं होत. पण ऐनवेळी पोर्तुगीज बादशाह जॉन(चौथा) याच्याऐवजी कॅथरीनचे लग्न इंग्लंडच्या राजासोबत झाले.
संपूर्ण मुंबई शहर, ब्राझील, वेस्ट इंडीज बेटांचा काही भाग यासह मोठी रक्कम इंग्लंडच्या राजाला लग्नात हुंडा म्हणून मिळाली. ब्रागांझा आणि चार्ल्स यांचा विवाह 31 मे 1662 रोजी झाला होता. हुंड्यात मिळाल्याने राजाला मुंबईवर दावा करता येत नव्हता. मुंबईचा नेमका कोणता भाग हुंडा म्हणून दिला गेला होता, हे ठरवता येत नव्हते. राजाने मुंबईची सात बेट ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीला विकली. त्या बदल्यात कंपनीने त्याला 6 टक्के व्याजदराने 50 हजार पौंड कर्ज म्हणून दिले. दर वर्षी 10 पौंड एवढी रक्कम वार्षिक भाडे म्हणून जमा करण्याच्या अटीवर मुंबई ईस्ट इंडिया कंपनीला देण्यात आली. याचा अर्थ महिन्याचे भाडे आताच्या रुपयानुसार 88 रुपये इतके होते.