दिल्ली निवडणुकीत गाजलेले सर्वात मोठे मुद्दे! दारू घोटाळ्याचा निवडणुकीवर काय परिणाम झाला?

दिल्ली निवडणुकीत सर्वात जास्त गाजलेले मुद्दे. जाणून घेऊया दिल्लीकरांचा कौल.  

वनिता कांबळे | Updated: Feb 5, 2025, 07:31 PM IST
दिल्ली निवडणुकीत गाजलेले सर्वात मोठे मुद्दे! दारू घोटाळ्याचा निवडणुकीवर काय परिणाम झाला? title=

Zeenia AI Exit Poll :  दिल्ली विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांचं भवितव्य EVMमध्ये बंद झाले आहे. दिल्लीत 57.70 टक्के मतदान झाले.  दिल्ली कुणाची याचा फैसला शनिवारी होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप हॅटट्रिक करणार की भाजप बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची देखील उत्सुकता आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल झी २४ तासवर जाहीर झाला आहे. झीनियाच्या AI एक्झिट पोलमध्ये दिल्ली निवडणुकी सर्वात मोठे मुद्दे कोणते ज्याची सर्वात जास्त चर्चा झाली.

दिल्ली निवडणुकी सर्वात मोठे गाजलेले मुद्दे कोणते. दिल्लीतील दारू घोटाळ्याचा निवडणुकीवर काय परिणाम झाला. मतदारांचा कौल काय होता. हे देखील झीनियाच्या AI एक्झिट पोलमध्ये जाणून घेण्यात आले. 

दंगलीचा दिल्ली निवडणुकीवर काही परिणाम झाला का?
60 टक्के लोक  हो म्हणाले तर 30 टक्के लोक नाही असं म्हणाले.  

दारू घोटाळ्याचा निवडणुकीवर काही परिणाम झाला का?
55 टक्के लोक  हो म्हणाले तर 45 टक्के लोक नाही असं म्हणाले.  

यमुना नदीतील विषारी प्रदूषणाच्या मुद्दायाचा फायदा कोणाला?
'आप'चा फायदा 40 टक्के भाजपचा फायदा 60 टक्के

केजरीवाल यांना त्यांच्या 'तुरुंग भेटी'बद्दल सहानुभूती मिळाली का?
45 टक्के लोक  हो म्हणाले तर 55 टक्के लोक नाही असं म्हणाले.  

दिल्लीला कोणाचा जाहीरनामा आवडला?
आप 50 टक्के
भाजप 30 टक्के
काँग्रेस 20 टक्के 

दिल्ली निवडणुकीत मतदानाचा सर्वात मोठा मुद्दा कोणता?
पाणी 25 टक्के
रस्त्यांचा विषय 20 टक्के
कायदा आणि सुव्यवस्था 30 टक्के
महागाई 15 टक्के
बेरोजगारी 10 टक्के

भाजपला 'आप'कडून झोपडपट्टीतील मते हिसकावून घेता आली का?
40 टक्के लोक  हो म्हणाले तर 60 टक्के लोक नाही असं म्हणाले.  

DISCLAIMER: दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल 8 फेब्रुवारी रोजी लागतील. तत्पूर्वी ZEE २४ तास ने आपल्या प्रेक्षकांसाठी AI एक्झिट पोल आणला आहे. या एक्झिट पोलमध्ये आम्ही आर्टिफीशिअल इंटेलिजेन्सचा वापर केलाय. डेटा कलेक्शन आणि डेटा प्रोसेसिंगमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. उल्लेखनीय बाब म्हणजे, झी २४ तास तुम्हाला जे आकडे दाखवत आहे, ते सर्व्हे एजंसीचे आहेत. हे आकडे विधानसभा निवडणुकीचे निकाल नसून केवळ एक्झिट पोलची आकडेवारी आहे. एक्झिट पोलचे आकडे आणि निकाल यात फरक असू शकतो.