Delhi Exit Poll 2025 : 27 वर्षांनंतर दिल्लीत भाजप सरकार? मॅट्रिझ इंडिया आणि जेव्हीसीच्या एक्झिट पोलमध्ये कोणाला बहुमत?

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडताच अनेक एजन्सीने आता त्यांचे एक्झिट पोल जाहीर केले आहेत. ज्यामध्ये मॅट्रिझने त्यांच्या एक्झिट पोलमध्ये कोणाला बहुमत मिळेल यासंदर्भात अंदाज व्यक्त केला आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 5, 2025, 07:39 PM IST
Delhi Exit Poll 2025 : 27 वर्षांनंतर दिल्लीत भाजप सरकार? मॅट्रिझ इंडिया आणि जेव्हीसीच्या एक्झिट पोलमध्ये कोणाला बहुमत? title=

Delhi Exit Poll 2025 Results : दिल्ली विधानसभेसाठी बुधवारी 5 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीचा निकाल 8 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. अशातच मतदान संपताच वेगवेगळ्या सर्वेक्षण संस्थांकडून एक्झिट पोल प्रसिद्ध  करण्यात आले आहेत. यामध्ये कोणता पक्ष सरकार स्थापन करू शकतो? प्रत्येक पक्षाला किती जागा मिळू शकतात? याचा अंदाज या सर्वेक्षणातून जाहीर करण्यात आला आहे.  

मॅट्रिझ इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये काय?

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप-आपमध्ये काँटे की टक्कर सुरु आहे. एक्झिट पोलनुसार दिल्लीत भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. मॅट्रिझ इंडियाने देखील त्यांचे एक्झिट पोल जाहीर केले आहेत. ज्यामध्ये भाजपला 35 ते 40 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर मॅट्रिझ इंडियाच्या एक्झिट पोलनुसार आप पक्षाला 32 ते 27 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर कॉग्रेसला 2-3 जागा मिळणार असल्याचं मॅट्रिझ इंडियाच्या पोलमध्ये म्हटलं आहे.

जेव्हीसीच्या एक्झिट पोलमध्ये कोणाला बहुमत?

तर दिल्ली विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत आलेल्या अनेक पोलर्सनी भाजपच्या विजयाचे संकेत दिले आहेत. ज्यामध्ये जेव्हीसीच्या पोलनुसार, विधानसभा निवडणुकीत 'भाजप'ला 39-45 जागा मिळण्याची अपेक्षा आहे, तर 'आप' पक्षाला 22-31 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर तर एकेकाळी प्रमुख शक्ती असलेल्या काँग्रेस पक्षाला 0-2 अशा जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर इतरमध्ये 0-1 असा अंदाज जेव्हीसीच्या पोलमध्ये वर्तवला आहे. 

जर आपण गेल्या तीन विधानसभा निवडणुकांवर नजर टाकली तर यामध्ये आम आदमी पक्षाची म्हणजेच 'आप'  पक्षाची खरी ताकद अचूकपणे मोजण्यात एक्झिट पोल अपयशी ठरले आहेत. 2013 च्या निवडणुकीत त्रिशंकू विधानसभा येण्याचा अंदाज एक्झिट पोलने अचूकपणे वर्तवला होता, परंतु 2015 आणि 2020 च्या निवडणुकीत 'आप'च्या मोठ्या विजयाचा अंदाज ते अचूकपणे वर्तवू शकले नाहीत.