उपाशी पोटी दही खाणे सगळ्यांसाठी फायदेशीर नसते; जाणून द्या तुमच्यासाठी योग्य की त्रासदायक

काही लोकांवर उपाशी पोटी दही खाण्यचे परिणाम खूप विपरित होतात तर अनेकांसाठी उपाशी पोटी दही खाणे मदतरुप ठरते. तुमच्यासाठी उपाशी पोटी दही खाणे फयदेशीर की त्रासदायक?

Updated: Feb 5, 2025, 06:31 PM IST
उपाशी पोटी दही खाणे सगळ्यांसाठी फायदेशीर नसते; जाणून द्या तुमच्यासाठी योग्य की त्रासदायक title=

Benefits and side effects of eating curd: उपाशी पोटी दूध किंवा दही (योगर्ट) खाल्ल्याने काही लोकांना पोट फुगणे, आम्लपित्त (अ‍ॅसिडिटी), किंवा पचनाच्या समस्या होऊ शकतात. कारण डेअरी उत्पादनांमध्ये नैसर्गिक लॅक्टिक ऍसिड असते. हे लॅक्टिक अ‍ॅसिड पोटात आम्ल तयार करण्याचे काम करते. त्यामुळे काही लोकांना पोट फुगण्याचा त्रास होतो. पण अनेकांसाठी उपाशी पोटी दही खाणे मदतरुप ठरते.

दहीतील हेल्दी बॅक्टेरिया आणि त्याचे फायदे

दहीत असलेले प्रोबायोटिक्स (हेल्दी बॅक्टेरिया) आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हे बॅक्टेरिया पचन सुधारण्यास मदत करतात आणि पोटाच्या समस्यांपासून आराम देतात. दहीतील प्रोबायोटिक्स थेट आपल्या मोठ्या आतड्यांमध्ये जाऊन आरोग्य सुधारतात.

दहीतील पोषणतत्वे

दहीमध्ये कॅल्शियम, प्रथिने (प्रोटीन), आणि व्हिटॅमिन बी सारखे महत्वाचे पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. हे पोषक घटक हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि स्नायू मजबुत बनण्यासाठी उपयुक्त असतात. त्यामुळे दहीचा रोजच्या आहारात समावेश केल्याने आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

हायड्रेशन आणि गारवा

दहीत पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ते शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. उष्ण हवामानात दही खाल्ल्याने शरीराला गारवा मिळतो आणि डिहायड्रेशनपासून (निर्जलीकरण) संरक्षण मिळते. त्यामुळे उन्हाळ्यात दही खाणे अधिक फायदेशीर ठरते.

उपाशी पोटी दही खाण्याचे तोटे

काही लोकांसाठी उपाशी पोटी दही खाणे त्रासदायक ठरू शकते. जेव्हा आपण उपाशी पोटी दही खातो, तेव्हा पोटात असलेले गॅस दहीतील काही फायदेशीर बॅक्टेरियांचा नाश करू शकते. त्यामुळे दहीचे प्रोबायोटिक फायदे कमी होतात. यासाठी दही ओट्स, फळे किंवा इतर कार्बोहायड्रेटयुक्त अन्नासोबत खाणे चांगले ठरते, ज्यामुळे ते पचनास अधिक योग्य ठरते.

हे ही वाचा: मनुक्यांच्या पाण्याचे सेवन आहे आरोग्यासाठी लाभदायक; शरीराला मिळतात 'हे' फायदे

अ‍ॅसिडिटीचा धोका

काही लोकांना उपाशी पोटी दही खाल्ल्याने आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो. विशेषतः ज्यांना अ‍ॅसिड रिफ्लक्स किंवा पोटदुखीचा त्रास असतो, त्यांच्यासाठी हे अधिक त्रासदायक ठरू शकते. दहीतील लॅक्टिक ऍसिड पोटातील आम्लाबरोबर मिसळून अस्वस्थता किंवा पोट फुगण्याचे कारण बनू शकते.

उपाशी पोटी दही किंवा दूध खाण्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. काही लोकांसाठी हे पचन सुधारण्यासाठी उपयुक्त ठरते, तर काही लोकांना यामुळे अ‍ॅसिडिटी किंवा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. आपल्या शरीराच्या गरजा आणि आरोग्याच्या स्थितीनुसार दही खाण्याचा निर्णय घ्या. शक्यतो सगळ्यांनीच दही इतर अन्न पदार्थांसोबत खाल्ल्यास त्याचे फायदे अधिक चांगले मिळू शकतात.

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)