History of the Laughing Buddha: फेंगशुई परंपरेनुसार लाफिंग बुद्धा किंवा हसणारा बुद्धा आनंद, समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. त्या च्या हसऱ्या चेहऱ्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा पसरते आणि प्रसन्नता येते. पण लाफिंग बुद्धा नेहमी हसणारा का असावा, यामागेही एक आध्यात्मिक कारण आहे. त्यांची हसतमुख मूर्ती आंतरिक समाधान आणि मानसिक शांततेचे प्रतीक आहे. खरा आनंद हा भौतिक गोष्टींवर नाही, तर आत्मिक संतोषावर अवलंबून असतो. फेंगशुईनुसार लाफिंग बुद्धा घरात ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सौख्य-समृद्धी येते. त्यांच्या मोठ्या पोटालाही समृद्धीचे प्रतीक मानले जाते. लाफिंग बुद्धा आपल्याला जीवनात हलकेपणाने आणि आनंदाने जगण्याची प्रेरणा देतात.
लाफिंग बुद्धाचा इतिहास 10व्या शतकातील चीनमधील बौद्ध भिक्षू बुदाई यांच्याशी जोडलेला आहे. ते लियांग राजवटीदरम्यान प्रसिद्ध झाले. बुदाई नेहमी हसतमुख असायचे. त्यांच्या दयाळूपणामुळे लोक त्यांना खूप मान द्यायचे. ते एका मोठ्या पिशवीत अन्न आणि भेटवस्तू ठेवत आणि गरजू लोकांमध्ये वाटत. त्यामुळे ते उदारता आणि परोपकाराचे प्रतीक बनले. त्यांच्या हसऱ्या स्वभावामुळे त्यांची मूर्ती आनंद, समृद्धी आणि ज्ञानाचे प्रतीक मानली जाते. तर आता फक्त चीनमध्येच नाही तर भारतासहीत अनेक देशांमध्ये लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात ठेवली जाते.
फेंगशुईनुसार लाफिंग बुद्धा योग्य ठिकाणी ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. घरात किंवा कार्यालयात लाफिंग बुद्धा ठेवण्याचे अनेक फायदे आहेत:
1. मुख्य दरवाजाजवळ
घराच्या प्रवेशद्वाराजवळ लाफिंग बुद्धा ठेवला तर सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते आणि नकारात्मक शक्ती दूर राहतात.
2. दक्षिण-पूर्व दिशेला
घराच्या किंवा कार्यालयाच्या दक्षिण-पूर्व भागात लाफिंग बुद्धा ठेवल्याने यश आणि समृद्धी वाढते.
3. लिव्हिंग रूम
ही मुर्ती खोलीमध्ये ठेवल्याने कुटुंबात आनंद आणि शांती नांदते.
हे ही वाचा: Horoscope : बुधवार 5 राशींसाठी ठरेल खास; असं असेल 12 राशींचं भविष्य
4. ऑफिस डेस्क
ऑफिस डेस्कवर लाफिंग बुद्धा ठेवला तर कामात प्रगती होते आणि कामात येणाऱ्या अडचणी दूर होतात.
(Disclaimer: सदर लेख दंतकथा आणि सामन्या ज्ञानावर आधारित असून झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)