चॉकलेट, व्हॅनिला सोडा घरच्या घरी बनवा स्ट्रॉबेरी चीजकेक; जाणून घ्या रेसिपी

Strawberry Cheesecake Recipe: सध्या बाजारात स्ट्रॉबेरी भरपूरप्रमाणत उपलब्ध आहेत. अशात त्याचा केक घरीच घरी कमी मेहनत करून बनवू शकता. 

तेजश्री गायकवाड | Updated: Feb 5, 2025, 04:32 PM IST
चॉकलेट, व्हॅनिला सोडा घरच्या घरी बनवा स्ट्रॉबेरी चीजकेक; जाणून घ्या रेसिपी  title=
How to Make Strawberry Cheesecake:  गोड खाण्याचे अनेक लोक शौकीन असतात. अनेकजण जेवण झालं की आवर्जून गोड खातात. जर तुम्ही एखादी गोड रेसिपीच्या शोधात असाल तर आम्ही मदत करत आहोत. जी रेसिपी आम्ही शेअर करणार आहोत त्यासाठी कमी मेहनत घ्यावी लागेल आणि तरीही खूप चव मिळेल. तुम्ही घरच्या घरी केक बनवू शकता. यासाठी तुम्हाला जास्त तामझाम करायची गरज नाही. या सिजनमध्ये नेहमीच्या चॉकलेट, व्हॅनिला सोडून स्ट्रॉबेरी केक बनवू शकता. सध्या सध्या बाजारात स्ट्रॉबेरी भरपूरप्रमाणत उपलब्ध आहेत. अशात त्याचा केक घरीच घरी कमी मेहनत करून बनवू शकता.  चला  महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेड चे गोपालासॅमी एस, स्पेशॅलिटी शेफकडून स्ट्रॉबेरी चीजकेक कसा बनायचा याची रेसिपी जाणून घेऊयात. 
 

जाणून घ्या साहित्य 

 
१ किलो क्रीम चीज 
४ अंड्यातील पांढरा भाग
४ अंड्यातील पिवळा बलक
६० ग्रॅम कॉर्नफ्लार 
७० मिली दूख
२२५ ग्रॅम क्रीम फ्रेश
२०० ग्रॅम सावर क्रीम 
 
 

जाणून घ्या कृती

 
मिक्सरच्या मध्यम आकाराच्या भांड्यात क्रीम चीज, कॉर्न स्टार्च आणि साखर एकत्र करा. 
हलके होईपर्यंत फेटुन घ्या. 
हळूहळू अंडी मिसळा आणि फेटत राहा.
सावर क्रीम घाला आणि अखेर हेवी क्रीम मिसळा.
अजून थोडा वेळ फेटून घ्या. 
केक मोल्ड किंवा रिंगमध्ये कुकी क्रम्बचा बेस तयार करा. 
मिश्रण गाळून घ्या आणि व्यवस्थित ग्रीस केलेल्या केक मोल्डमध्ये ओता.
 
 
 
एक तासभर वॉटर बाथमध्ये 160 अंशावर बेक करा.
थंड करून डीमोल्ड करा आणि फ्रीजमध्ये ठेवा. 
केक थंड झाल्यावर स्ट्रॉबेरीने सजवा.
वरती ब्रशने अप्रिकॉट ग्लेझ लावा.