Male Fertility : लग्न हे महिला असो किंवा पुरुष यांच्यासाठी आयुष्यातील मोठा बदल असतो. लग्नानंतर पती पत्नीचं नातं प्रेम आणि विश्वासावर पुढे जातं. त्यात अजून एक महत्त्वाची भूमिका म्हणजे तुमचं लैंगिक जीवन आनंद असेल तर तुमच्या संसार हा सुखाचा असतो. कोणत्याही पुरुषासाठी लग्नानंतरचं आनंदी लैंगिक जीवन हे त्याच्या शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर अवलंबून असतं. त्यामुळे शारीरिक ताकदसाठी तुमच्या सवयी, खाण्याचा सवयी यावर अवलंबून असतात. खराब जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे पुरुषांची प्रजनन क्षमता कमी होते. याचा थेट परिणाम पती - पत्नीमधील नात्यावरही होतो. अनेक पुरुष वडील होण्यापासून वंचित राहतात. तसंच शरीरात कमकुवतपणाबरोबर इतर समस्याही येऊ शकतात. त्यामुळे सहनशक्ती आणि लैंगिक जीनव सुधारण्यासाठी पुरुषांनी आहारात 5 पदार्थांचा समावेश करावा. (If you feel your fertility is low after marriage Then include these 5 foods in your diet your strength will increase Male Fertility)
संशोधनानुसार, फळांचे सेवन केल्याने शरीरात इरेक्टाइल डिसफंक्शनचा धोका 14 टक्क्यांनी कमी होतो. बेरी, द्राक्षे, सफरचंद आणि लिंबूवर्गीय फळांमध्ये फ्लेव्होनॉइड्स मुबलक प्रमाणात आढळतात. हे इरेक्शन सुधारण्यास फायदेशीर ठरतं असं तज्ज्ञ सांगतात. यामध्ये टरबूजाचाही समावेश आहे. ते तुमची कामवासना वाढविण्यास फायदेशीर ठरतं. याचे कारण या फळांमध्ये सिट्रुलीन असते, जे शरीरात आर्जिनिनसारखे अमीनो आम्ल सोडते.
प्रत्येकाने आपल्या आहारात बदाम, अक्रोड, काजू, पिस्ता आणि शेंगदाणे यांसारखे सुके मेवा समाविष्ट कराला हवा यामध्ये झिंक आणि आर्जिनिनचे प्रमाण जास्त असतं. याशिवाय, सुक्या मेव्यांमध्ये अक्रोड हे विशेषतः फायदेशीर आहे. ते ओमेगा-3 फॅटी अॅसिडने समृद्ध मानलं गेलंय. याशिवाय, अक्रोड शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यास फायेदशीर आहे. यासोबतच, ते प्रजनन क्षमता वाढवण्यास मदतगार आहे.
एका कप कॉफीमध्ये असलेले कॅफिन आरोग्यासाठी चांगले मानलं जातं. हे तुमचं मनं प्रसन्न करतं. मात्र जास्त प्रमाणात सेवन करणे देखील हानिकारक ठरण्याची शक्यता आहे. यामुळे चिडचिडेपणा वाढण्याचा धोका असतो. यामुळे लैंगिक कार्यक्षमता देखील बिघडू शकते. दुसरीकडे, कॉफीचे जास्त सेवन केल्याने डिहायड्रेशनची भीती अशते. यामुळे थकवा आणि कोरडेपणाची समस्या जाणवते.
डार्क चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. हे हृदय निरोगी ठेवतात. यामध्ये असलेले फ्लेव्हनॉल्स रक्तप्रवाह वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे पुरुषांना इरेक्टाइल डिसफंक्शनपासून मुक्तता मिळते. यासाठी कमीत कमी 60टक्के कोकोपासून बनवलेले डार्क चॉकलेट खा.
जर तुम्ही मांसाहारी पदार्थ खात असाल तर तुमच्या आहारात मांसाचा समावेश नक्कीच करा. त्यात उच्च अमीनो आम्ल आढळतात. मांसामध्ये झिंक, कार्निटाईन आणि आर्जिनिन सारखे पोषक घटक आढळतात, जे रक्ताभिसरण सुधारतात. अनेक वेगवेगळ्या संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की ते इरेक्टाइल डिसफंक्शनपासून मुक्त होण्यास मदत करू शकते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)