Mumbai BMC Budget 2025-2026 : देशातील सर्वात मोठी आणि श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी (4 फेब्रुवारी 2025) सादर झाला. यंदाच्या अर्थसंकल्पात तब्बल 14.19 टक्के इतकी रेकॉर्डब्रेक वाढ झाली आहे. इतिहासातील सर्वात मोठा अर्थसंकल्प माला जात आहे. निवडणूकीच्या तोंडावर सादर करण्यात आलेले मुंबई महापालिकेचे चे बजेट 74,427 हजार कोटींवर पोहचले आहे. मुंबई महापालिका 16000 कोटींची FD मोडणार आहे.
निवडणुकीच्या तोंडावर थेट करवाढ करण्यात आलेली नाही मात्र, उत्पन्न वाढीसाठी आगामी काळात नवे कर लागु करण्याचे संकेत अर्थसंकल्पात देण्यात आले आहेत. झोपडपट्टीमधील व्यावसायिक आस्थापनांना सर्वेक्षणानंतर कर लागु केला जाणार आहेत. सोबतच आगामी काळात मुंबईकरांना कच-यावरही टॅक्स द्यावा लागणार आहे.
2026 च्या पावसाळ्यापूर्वी मुंबईकरांना उत्तम रस्ते मिळणार आहेत.2026 च्या पावसाळ्यापूर्वी मुंबई महापालिकेच्या रस्ते काँक्रीटकरणाचे काम शंभर टक्के पूर्ण करणार. यंदाच्या वर्षी मे महिन्याअखेरपर्यंतच रस्ते खोदण्यास परवानगी दिली जाणार.
मुंबई महापालिकेच्या एफडींमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 854 कोटींची वाढ झाली आहे. मात्र, यंदाच्या वर्षी पुन्हा एकदा विकासकामांसाठी एफडी महापालिकेच्या खर्चात वळत्या केल्या जाणार आहेत. यासाठी 16 हजार कोटींच्या एफडी तोडल्या जाणार आहेत.
मुंबई महापालिकेला मिळणार वाढीव प्रिमीयम एफएसआय धारावी प्राधिकरणाचा स्वतंत्र कारभार सुरु झाल्यानं त्यांच्या प्रिमियम एफएसआयचा वाटा मुंबई महापालिकेला मिळणार आहे. मुंबई महापालिकेला आता एफएसआयचा 25 टक्क्यांऐवजी 50 टक्के हिस्सा मिळणार. हा हिस्सा 75 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची महापालिकेची शासनाकडे विनंती आहे. पालिकेच्या अर्थ संकल्पात बेस्ट प्रशासनाठी 1 हाजार कोटींची तरतूद करण्यात आली. कोस्टल रोडचा विस्तार दहिसर आणि भाईंदर पर्यंतचा विस्तार वर्सोवा ते दहिसर ते भाईंदर पर्यंतच्या कोस्टल रोड प्रकल्प करिता 4300 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाकरिता 1958 कोटी इतकी तरतूद करण्यात आली.
मुंबईसाठी विशेष वातावरणीय बजेट सादर,पर्यावरण खात्याकरता 113 कोटींची तरतूद, मुंबई महापालिका आरोग्य खात्याचे बजेट 7379 कोटी बजेटच्या दहा टक्के तरतूद आरोग्य खात्यासाठी करण्यात आली. मुंबई महापालिका शिक्षण खात्याचा यंदाच्या वर्षीच बजेट 3955 कोटींची तरतूद, सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी 5545 कोटी व मल निसारण प्रचालन साठी 2477 कोटी यांचा समावेश असलेली एकूण 13457 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.