महिलांनी एकमेकींचे केस खेचून खेचून मारलं; VIDEO तुफान व्हायरल, कारण वाचून डोक्याला हात लावाल

Viral Video: झाशीमध्ये कुत्र्याला फिरवण्यावरुन दोन महिलांमध्ये तुफान राडा झाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुलीचा भाऊ मध्यस्थी करण्यासाठी आला असता त्यालाही मारहाण करण्यात आली, ज्यामध्ये तो जखमी झाला.   

शिवराज यादव | Updated: Feb 4, 2025, 04:14 PM IST
महिलांनी एकमेकींचे केस खेचून खेचून मारलं; VIDEO तुफान व्हायरल, कारण वाचून डोक्याला हात लावाल title=

Viral Video: उत्तर प्रदेशातील झांशी येथे श्वानाला फिरवण्यावरुन दोन महिलांमध्ये जबरदस्त हाणामारी झाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मारहाण होताना पाहून त्यातील एका महिलेचा भाऊ मध्यस्थी करण्यासाठी पोहोचला होता. मात्र त्यालाही मारहाण करण्यात आली, ज्यामुळे तो जखमी झाला आहे. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी व्हायरल व्हिडीओची दखल घेतली असून, याप्रकरणी कारवाई सुरु केली आहे. 

व्हायरल व्हिडीओत एक तरुणी एका तरुणीला काठीने मारहाण करताना दिसत आहे. यानंतर एक महिला येते आणि तरुणीला मारहाण करण्यास सुरुवात करते. दोघी एकमेकींचे केस खेचून मारहाण करत असतात. यानंतर दोघी खाली जमिनीवर पडतात. यावेळी मारहाणीत तरुणीचे कपडेही फाटतात. हे पाहिल्यानंतर तिचा भाऊ मध्यस्थीसाठी पुढे येतो. मात्र नंतर त्यालाही मारहाण होते. 

घटनास्थळी आणखी काही महिला येतात ज्या भांडण करणाऱ्या तरुणीचे केस खेचून ओढतात आणि खाली पाडतात. प्रकरण शांत झाल्यानंतर तरुणी आपल्या जखमी भावाला घेऊन जिल्हा रुग्णालयात पोहोचले. तिथे ती आपलं नाव मंजू शुक्ता सांगते आणि अंगावरील जखमा दाखवते.

जखमी तरुणाची बहीण मंजूचं म्हणणं आहे की, "परिसरात राहणारे लोक आम्हाला शिव्या देत होते. माझा भाऊ जेव्हा घरातून बाहेर पडला तेव्हा त्यांनी विरोध केला. त्याला मारहाण करण्यात आली. आई बचावासाठी पोहोचली असता तिलाही मारहाण कऱण्यात आली".

पोलीस अधीक्षक नगर ज्ञानेंद्र कुमार यांनी सांगितलं की, सिपरी बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही महिला आणि तरुणींमध्ये मारहाण झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. यामध्ये एका पक्षाने तक्रार दाखल केली आहे, त्याच्या आधारे आम्ही गुन्हा दाखल केला आहे. आपल्या कुत्र्याला बाहेर फिरवण्यावरुन त्यांच्यात वाद झाल्याचं सांगितलं जात आहे.