Priyanka Chopra In mumbai: अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या मुंबईत असल्याची माहिती वाऱ्याच्या वेगाने चाहत्यांनाकडे पोहोचली. ती मुंबईत विशेष कारणाने आली आहे. बॉलिवूडपासून तर हॉलिवूडपर्यंत तिच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. प्रियांका भावाच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी आलेली आहे. तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा (siddharth chopra) लवकरच विवाहबंधनात अडकणार असून, संपूर्ण कुटुंब लग्नाच्या तयारीत गुंतलं आहे. सिद्धार्थने गेल्या वर्षी अभिनेत्री नीलम उपाध्याय हिच्यासोबत साखरपुडा केला होता.
प्रियांका चोप्रा तिच्या कुटुंबाच्या खूप जवळ राहण्याचा प्रयत्न करत असते. आगामी चित्रपटांच्या शुटिंगमध्ये व्यस्त असूनही ती भाऊ सिद्धार्थच्या लग्नासाठी भारतात आली आहे. तिचे कुटुंबावर असलेले प्रेम नेहमीच चाहत्यांसमोर येत राहते. यावेळी देखील तिने भावाच्या आनंदात सामील होण्यासाठी वेळ काढला आहे.
या खास प्रसंगासाठी प्रियंकाने कामातून विश्रांती घेतली असून, कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसत आहे. या खास क्षणांचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे तुफान व्हायरल होत आहेत. प्रियांका चोप्रा तिच्या कुटुंबीयांसोबत मुंबईत मजा करत आहे. तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत कॅप्शन दिली "कसे संपूर्ण कुटुंब लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे." प्रियांकाचा पती निक जोनस अद्याप भारतात पोहोचलेला नाही, पण प्रियंका मुलीला घेऊन आधीच मुंबईत आली आहे.
सिद्धार्थ चोप्राची होणारी पत्नी नीलम उपाध्याय ही देखील अभिनेत्री आहे. तिने साऊथ इंडस्ट्रीमध्ये काही चित्रपट केले आहेत. यापूर्वी सिद्धार्थ चोप्राचा साखरपुडा इशिता कुमार आणि कनिका माथुर यांच्यासोबत झाला होणार अश्या चर्चा रंगल्या होत्या. पण, दोन्ही वेळा त्याचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही.
प्रियांकाने मालतीचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे, या फोटोमध्ये मालती खिडकीतून समुद्राकडे पाहताना दिसतेय. हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत. आणखी एका व्हायरल फोटोमध्ये प्रियांकाने डान्स रिहर्सलचे फोटो शेअर केले आहेत तसेच कॅप्शनमध्ये लिहिले, "शादी का घर..!! आणि हे उद्यापासून सुरू होणार आहे. माझ्या भावाचा, सिद्धार्थ चोप्राचा, विवाह नीलम उपाध्यायसोबत होत आहे. संगीताच्या सरावापासून ते कुटुंबाच्या जॅम सेशनपर्यंत, घरी येऊन खूप छान वाटत आहे. माझं मन भरून आलंय आणि माझं शेड्युलदेखील भरलंय!" तिने पुढे लिहिले "कोण म्हणालं की लग्न करणे सोपे आहे? कुणीच नाही... पण हे मजेदार आहे? अगदीच! पुढील काही दिवसांची आतुरतेने वाट पाहते आहे." प्रियांकाची लाडकी लेक मालतीदेखील लग्नाच्या घरात स्वतःच्या खेळात व्यस्त आहे. एकुण एक प्रियांका तिच्या भावाच्या लग्नासाठी अत्यंत उत्साही आहे. असे म्हणता येईल.
मधू चोप्रांचा आनंदसुद्धा गगनात मावणार नाही एवढा आहे. त्यांनी एक फोटो शेअर करत लिहिले, "नवऱ्याची आई लग्नात धम्माल करण्यासाठी तयार आहे." ही पोस्ट पाहून प्रियंकाचे चाहते आणि कुटुंबीय सर्वजण खूप उत्साही आहेत.
अलीकडेच प्रियाेका हैदराबाद येथे होती. काही बातम्यांनुसार, तिने एस. एस. राजामौली यांचा चित्रपट साईन केल्याचं सांगितलं जात आहे. या आगामी चित्रपटासाठी प्रियांका 30 कोटी रुपयांचे मानधन घेणार आहे. या चित्रपटात महेश बाबू प्रमुख भूमिकेत दिसणार. ही बातमी एकताच चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला याशिवाय ती सर्वात जास्त मानधन घेणारी भारतीय अभिनेत्री आहे, असं सांगितलं जातंय.